श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट व सोलापूर रनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकोट येथे आयोजित 10k भक्ती रन स्पर्धेत वैशाली केशव गुंटूक यांनी 5 किमी अंतर रनिंगमध्ये सहभाग नोंदवून 41 ते 50 वयोगटात तिसरा क्रमांक पटकाविला आहे. या यशाबद्दल श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोटचे श्री. जन्मेंजयराजे भोसले व अध्यक्ष श्री. अमोलराजे भोसले यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यावेळी सोलापूर रनर्स असोसिएशनचे संस्थापक आतिश शहा व अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या. राज्यस्तरीय मॅरेथॉनमध्ये महाराष्ट्रातून हजारो स्पर्धक उपस्थित होते. तसेच त्याचदिवशी दुपारच्या सत्रात सोलापूर येथे माननीय आमदार श्री. दिलीपराव माने यांच्या नेतृत्वाखाली आयोजित सोलापूर किचन क्वीन या पाककलेच्या स्पर्धेत देखील यशस्वी होऊन आपले कर्तुत्व दाखवून दिले आहे. मा. दिलीपराव माने यांच्या धर्मपत्नी सौ. मानेताई व परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या लंडन येथील फूड सायंटिस्ट मृणाल मॅडम यांनी वैशाली यांच्या तेलरहीत व्यंजनांचा विशेष कौतुक केले आहे. पाक कलेच्या स्पर्धेत राज्यभरातून 600 स्पर्धक सहभागी झाले होते.
एखाद्या स्त्रीला घरदार सांभाळत स्वताच्या निरोगी स्वास्थ्यसाठीही वेळ काढता येते हे वैशाली गुंटूक यांनी सिद्ध केले आहे.
एकाच दिवशी धावण्यात आणि पाककलेमध्ये पारितोषिक पटकावून स्त्री शक्तीचे उत्तम उदाहरण दाखवून दिल्याबद्दल वैशाली केशव गुंटूक यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे.
Post Views: 14