मंगळवेढा – मंगळवेढ्यातील माहेश्वरी आर्ट गॅलरीचे उद्घाटन आषाढी वारीच्या शुभ मुहूर्तावर पंढरपूर येथे राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच झाले असून या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी माहेश्वरी आर्ट गॅलरी मधील कलाकृतीचे कौतुक केले आहे.
मंगळवेढा येथे शिक्षण प्रसारक मंडळाच्या सचिव डॉ.प्रियदर्शनी महाडिक यांच्या मार्गदर्शनातून माहेश्वरी आर्ट गॅलरी साकारली आहे. या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी राज्याचे मंत्री गिरीष महाजन,पालकमंत्री जयकुमार गोरे, आ.समाधान आवताडे,आ.अभिजीत पाटील,आ.राजेंद्र राऊत,माजी आ.प्रशांत परिचारक,युवक नेते पवन महाडिक तसेच अन्य पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. उद्घाटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रियदर्शनी महाडिक यांच्या पुढील कार्यक्रमास शुभेच्छा देवून आषाढी वारीच्या पावन पर्वावर उद्घाटन झाल्यामुळे माहेश्वरी आर्ट गॅलरीच्या वाटचालीला एक नवी दिशा मिळाल्याच्या भावना त्यांनी व्यक्त केली.
Post Views: 13