Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूरची वाटचाल शाश्वत पाणीपुरवठ्याच्या दिशेने

तरुण भारतbyतरुण भारत
July 26, 2026
in solapur
0
सोलापूरची वाटचाल शाश्वत पाणीपुरवठ्याच्या दिशेने
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : सोलापूर शहरातील नागरिकांना सातत्यपूर्ण, सुरक्षित, विश्वासार्ह आणि शाश्वत 24×7 पाणीपुरवठा सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने  महानगरपालिका आणि जागतिक बँकेच्या प्रतिनिधींची उच्चस्तरीय एकदिवसीय कार्यशाळा  झाली. यामध्ये विविध मुद्द्यांवर  सखोल मंथन करण्यात आले.
        कार्यशाळेस जागतिक बँकेकडून डॉ. आलोक सुमन, श्रीनिवास राव, जोर्ग, कॅमेन यी, रोझ डोमिंगोस, गुस्तावो, मूर्ती आणि सुमन तर महानगरपालिकेकडून महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, भाजप सोलापूर शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, अभियंता उमर बागबान व इतर अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यशाळेत सोलापूर शहराच्या विद्यमान पाणीपुरवठा व्यवस्थेतील आव्हाने, शहराची वाढती लोकसंख्या व भविष्यातील पाण्याची मागणी, उपलब्ध जलस्रोतांची दीर्घकालीन सुरक्षितता आणि सध्याच्या ठरावीक वेळेच्या पाणीपुरवठ्यातून निरंतर 24×7 पाणीपुरवठ्याकडे संक्रमण करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी शहराच्या अंतर्गत पाणीपुरवठा सुधारणा प्रकल्पाच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे  सादरीकरण करण्यात आले. यामध्ये शहराची विद्यमान व भविष्यातील पाण्याची मागणी, शहरवाढीचे कल, अस्तित्वातील पाणीपुरवठा पायाभूत सुविधांची स्थिती, आवश्यक बळकटीकरण, बल्क वॉटर आणि वितरण प्रणालीतील प्रस्तावित सुधारणा, भांडवली गुंतवणूक, प्रकल्प अंमलबजावणीचे टप्पे आणि नागरिकांना मिळणाऱ्या अपेक्षित सेवा सुधारणांचा आढावा घेण्यात आला.
पाणीगळती व एनआरडब्ल्यू कमी करण्याला प्राधान्य
24×7 पाणीपुरवठा यशस्वी करण्यासाठी नॉन रेवेन्यू वॉटर (एनआरडब्ल्यू) कमी करणे, पाणीगळतीवर नियंत्रण, मागणी व्यवस्थापन आणि वितरण व्यवस्थेची कार्यक्षमता वाढविणे या बाबींना प्राधान्य देण्याचे अधोरेखित करण्यात आले.
शहरात डिस्ट्रिक्ट मीटर्ड एरियाज  विकसित करून प्रत्येक भागातील पाण्याचा प्रवाह व दाब यांचे नियमित निरीक्षण करणे, पाणीगळती ओळखणे आणि टप्प्याटप्प्याने 24×7 पाणीपुरवठा क्षेत्र विकसित करण्याच्या कार्यपद्धतीवर चर्चा करण्यात आली.
प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी डिझाईन बिल्ड ऑपरेट (डीबीओ) या दीर्घकालीन करार पद्धतीवर सखोल चर्चा झाली.
 दर्जेदार पाणीपुरवठा करण्यास प्राधान्य : आयुक्त डॉ. ओम्बासे
महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी याबाबत सांगितले की, सोलापूर शहराची भविष्यातील वाढ लक्षात घेऊन पाणीपुरवठा व्यवस्थेचे सर्वंकष आधुनिकीकरण आवश्यक असल्याचे नमूद केले. जलस्रोतापासून ते नागरिकांच्या नळजोडणीपर्यंत संपूर्ण पाणीपुरवठा साखळी अधिक सक्षम, कार्यक्षम आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने महानगरपालिका प्रयत्नशील आहे. नागरिकांना पुरेशा दाबाने, सुरक्षित आणि विश्वासार्ह पाणीपुरवठा उपलब्ध करून देणे तसेच पाणीगळती कमी करून उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करणे याला प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
प्रत्येक घराला मीटरयुक्त नळजोडणी; स्काडाद्वारे आधुनिक नियंत्रण
प्रकल्पांतर्गत शहरातील पात्र घरांना मीटरयुक्त नळजोडणी देणे, पाणीपुरवठा व्यवस्थेचे स्काडा आधारित रिअल-टाइम मॉनिटरिंग, प्रतिबंधात्मक व दुरुस्ती देखभाल, प्रभावी बिलिंग व महसूल व्यवस्थापन तसेच उत्तरदायित्वाची यंत्रणा सक्षम करण्याबाबत चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या सुविधेसाठी कस्टमर सर्व्हिस सेंटर्स  आणि प्रभावी  ग्रीइव्हांस रिड्रेसल मेकॅनिझम उभारून पाणीपुरवठ्याशी संबंधित तक्रारींचे वेळेत निराकरण करण्यावरही भर देण्यात आला.
Post Views: 12
Previous Post

मंगळवेढ्याच्या माहेश्वरी आर्ट गॅलरीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न

Next Post

वारकर्‍यांच्या मागण्यांसाठी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे ‘वारकरी महाअधिवेशन’ !

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वारकर्‍यांच्या मागण्यांसाठी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे ‘वारकरी महाअधिवेशन’ !

ताज्या बातम्या

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

July 26, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

July 26, 2026
शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

July 26, 2026
जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

July 26, 2026
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

July 26, 2026
अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

July 26, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीचे निकष स्पष्ट; इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना मोठा दिलासा

July 26, 2026

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटी

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1001571

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!