Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

वारकर्‍यांच्या मागण्यांसाठी आषाढी एकादशीला पंढरपूर येथे ‘वारकरी महाअधिवेशन’ !

तरुण भारतbyतरुण भारत
July 26, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पंढरपूर – वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राचा कणा असून महाराष्ट्र जोडण्याची शक्ती या संप्रदायात आहे. काही निधर्मी, डावे, पुरोगामी त्याला खिळखिळा करण्याचा प्रयत्न करत आहेत. वारकरी संप्रदाय हा सर्वसमावेशक असून  त्याने वेळोवेळी समाजाला दिशा देण्याचे काम केले आहे. धर्मनिष्ठ अशा वारकरी संप्रदायात वारकरी आणि हिंदु धर्म वेगळा असा भासवण्याचे षडयंत्र चालू आहे. वारकरी संप्रदाय आणि हिंदु धर्म यांच्यात फूट पाडण्याचे कटकारस्थान करणार्‍यांच्या विरोधात संघटित होण्याचा निर्धार वारकरी महाअधिवेशनात करण्यात आला. वारकर्‍यांच्या विविध प्रश्नांसाठी सद्गुरु श्री गंगागिरी महाराज मठ येथे २५ जुलैला वारकरी महाअधिवेशन आयोजित केले होते. त्या अधिवेशनात हा निर्धार व्यक्त करण्यात आला. ‘श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सरला’चे महंत गुरुवर्य प.पू. रामगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनासाठी १००० पेक्षा अधिक वारकरी भाविक उपस्थित होते. सूत्रसंचालन हिंदु जनजागृती समितीचे श्री. धनंजय बोकडे यांनी केले, तर श्री. विनोद रसाळ यांनी अधिवेशनाचा उद्देश स्पष्ट केला.

या अधिवेशनात वारकरी संप्रदायातील हिंदुत्वासाठी कार्य करणारे ह.भ.प. आणि पूजनीय संत यांना ‘घुसखोर’ संबोधून त्यांचा अवमान करणार्‍या तथाकथित पुरोगार्‍यांचा जाहीर निषेध करण्यात आला, तसेच हिंदुत्वनिष्ठ, संत यांचा ज्ञानेश्‍वर माऊलींची मूर्ती देऊन जाहीर सन्मान करण्यात आला. संत सोपानकाका सहकारी बँकेचे अध्यक्ष, भाजप महाराष्ट्र प्रदेश सचिव माजी आमदार संजय जगताप यांनी २० ज्ञानेश्वर माऊलींच्या मूर्ती उपस्थितांना भेट देण्यासाठी अर्पण म्हणून दिल्या. या प्रसंगी इंचगिरी मठाचे मठाधिपती सुदर्शन महाराज, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे  ह.भ.प. रामदास महाराज चौधरी, ह.भ.प. दत्तात्रय चोरगे महाराज यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.

विशेष सन्मान – हुपरी (कोल्हापूर) येथे निवेदन, तसेच विविध मार्गाने आंदोलन करून अवैध मदरसा तोडण्यास भाग पाडणारे श्री. नितीन काकडे, पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीदेवी मंदिरातील श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या रासायनिक लेपनाच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे श्री. गणेश लंके, गोरक्षणाच्या कामात सातत्याने काम करणारे राष्ट्रीय वारकरी सेनेचे उपाध्यक्ष ह.भ.प अंभोरे महाराज कारभारी यांचा संत ज्ञानेश्वर माऊलींची मूर्ती देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

हिंदूंनी इतिहासबोध, शत्रूबोध लक्षात घेऊन हिंदु धर्मावर होणार्‍या आघातांच्या विरोधात कृतीशील होणे आश्यक ! – प.पू. रामगिरी महाराज

हिंदू इतिहासातून शिकत नाहीत आणि आपण संघटित नाही त्यामुळेच अनेक आक्रमकांनी आपल्यावर राज्य केले. धर्मावर होणार्‍या आघातांविषयी आपण जागृत नसल्याने आज अन्य धर्मिय आिण चुकीचे विचार पसरवण्याचे फावते आहे. वारकरी संप्रदाय हा जगाला देण्याचे, जोडण्याचे काम काम करतो अशा वारकरी संप्रदायाविषयी आज भ्रमित करणारे विचार पसरवले जात आहेत, ‘समता’ दिंडी काढली जात आहे. आज काही जण पंढरपूरचा पांडुरंग हा विठ्ठल नसून अन्य कुणी असल्याचे सांगत आहे. जगात धर्म एकच असून तो म्हणजे सनातन धर्म आहे. लोकांना आज हिंदु धर्माचे महत्त्व न समजल्याने ते अन्य धर्मात जात आहेत. ‘लव्ह जिहाद’चे लोण आता प्रत्येक खेड्यापाड्यापर्यंत पोचले आहे. लहान मुलांनाचही बुद्धीभेद करून त्यांना इस्लामच्या प्रार्थना शिकवल्या जात आहेत. गोवंश रक्षणाच्या संदर्भात सरकारने मे महिन्यात एक अध्यादेश काढला असून जर एखाद्या परिसरात अवैधरितीने गोहत्या झाल्यास त्याला पोलीस, तहसीलदार, प्रशासन तितकेच उत्तरदायी आहेत ! हे लक्षात घेऊन आपण प्रशासनास गोहत्या थांबवण्यासाठी भाग पाडले पाहिजे.’’

वारकरी संप्रदायात घुसलेले खरे घुसखोर कोण ही सांगण्याची आता वेळ आली आहे ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

संघटित असलेल्या वारकरी संप्रदायात हेतूपुरस्सर दुफळी पाडण्याचे त्यांचा जाणीवपूर्वक बुद्धीभेद करण्याचे काम चालू आहे. श्री विठ्ठलाची भक्तीचे वर्णन करणारे जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे अनेक अभंग असतांना जाणीवपूर्वक ‘अल्लाशिवाय कुणी श्रेष्ठ नाही’, ‘अल्ला दिलावे-अल्ला खिलावे’, अशा प्रकारची केवळ एकांगी प्रसार करणारे फलक वारीच्या वाटेवर लावले जात आहेत. हे षड्यंत्र आपण वेळीच ओळखून हे हाणून पाडले पाहिजे. वारकरी संप्रदायात वारकरी संप्रदायात घुसलेले खरे घुसखोर कोण आहेत हे सांगण्याची आता वेळ आली आहे. महाराष्ट्रासाठी वारकरी संप्रदाय प्राण असून हिंदु धर्म आत्मा आहे ! देहलीतील कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात ‘पेपरफुटीच्या विरोधात चालू असलेल्या आंदोलनाच्या नावाखाली पोलिसांच्या गाड्या फोडण्यात आल्या, पोलिसांवर आक्रमण करण्यात आले. तिथे दंगलसदृष्य परिस्थिती होती. यात देशविरोधी घोषणा देण्यात आल्या. हे देशविरोधी षडयंत्र आपण लक्षात घेऊन त्याविरोधात कृती करण्याचा निर्धार केला पाहिजे.’’

विहिपचे ह.भ.प. नारायण महाराज शिंदे म्हणाले , ‘‘वारकर्‍यांच्या भोळेपणाला लाभ घेऊन काही लोक त्यांना निरनिराळ्या प्रकारची अमिषे दाखवून त्यांचा बुद्धीभेद करण्याचा प्रयत्न करतात. तरी यापुढील काळात वारकरी संप्रदायात घुसलेले कीर्तनकार शोधून काढून त्यांना समोर आणणे आवश्यक आहे!’’ राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ते ह.भ.म. महेंद्र महाराज म्हस्के म्हणाले, ‘‘सध्या देव, देश, धर्म यांच्यापुढे अनेक मोठी आव्हाने आहेत. संप्रदायासाठी काम करणारे अनेक लोक धर्माच्या व्यासपीठावर येऊन त्यांचे मत व्यक्त करण्यास घाबरतात; मात्र प.पू. वक्ते महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे अगोदर आपण वैदिक सनातन हिंदू आहोत मग वारकरी आहोत’, हे नेहमी लक्षात ठेवावे लागेल. राष्ट्रीय वारकरी परिषदेचे प्रवक्ता ह.भ.प. निवृत्ती महाराज हल्ल्याळीकर म्हणाले, ‘‘महाराष्ट्र सरकारने गोवंश हत्याबंदी कायदा लागू केला; मात्र हा कायदा कठोर केला पाहिजे. सर्व तीर्थक्षेत्रे मद्यमांस मुक्त केली पाहिजेत. इंद्रायणी, चंद्रभागा या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजेत.’’

विश्व हिंदु परिषदेचे केंद्रीय सहमंत्री श्री. दादा वेदक म्हणाले, ‘‘देव, देश, धर्म यांवर होणार्‍या आघातांच्या विरोधात वारकर्‍यांनी आवाज उठवला पाहिजेत. वारकरी संप्रदायाची, भक्ती, समर्पण, त्याग कुठेही अल्प होता कामा नये ! वारकरी संप्रदाय समाजमूल्य जतन करण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे. सध्या कुटुंबसंस्था, विवाहसंस्था यावर घाला घालण्याचे काम चालू असून समाज आणि राष्ट्र यांना जोडणारा दुवा कुटुंबव्यवस्था आदर्श म्हणून उभा केला पाहिजे. हिंदू कुटुंबाने त्यांचा एकतरी मुलगा धर्माच्या कामासाठी दिला पाहिजे !

राष्ट्रीय वारकरी परिषदेचे अध्यक्ष ह.भ.प. मारुति महाराज तुनतुने-शास्त्री म्हणाले, ‘‘अन्य धर्मिय संघटित असल्याने त्यांचा प्रत्येक मागण्यांची नोंद शासनाला घ्यावी लागते, तर हिंदू संघटित नसल्याने आज हिंदु धर्मावर आघात होत आहेत. गोमातेला राजमातेचा दर्जा असतांना पशूवधगृहाची अनुमती दिली जाते, दे दुर्दैवी आहे.’’ प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचे पीठासीन धर्माधिकारी श्री. प्रसाद पंडित म्हणाले, ‘‘वज्रलेपनच्या संदर्भात फोलपणा माहिती असूनही जाणीवपूर्वक मंदिर समितीने वज्रलेप करण्याचा अट्टाहास केला. याला मंदिर महासंघासह वारकरी संप्रदायाने पत्रकार परिषद घेऊन यातील फोलपणा समोर आणला, तसेच न्यायालयीन लढाईद्वारे याला स्थगिती मिळवली.’’

विविध ठरावांचा ‘हर हर महादेव’च्या गजरात पाठिंबा !
पंढरपूर येथील पुरातत्व विभागाच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील रासासयनिक लेपन प्रक्रिया या धर्मविरोधी निर्णयाच्या विरोधात वारकरी आणि मंदिर महासंघ यांनी लढा दिला आणि यापुढील काळात कोणत्याही प्रकारची रासायनिक लेपन प्रक्रिया करू नये, संत, संत-वांङ्मय, राष्ट्रपुरुष, धर्म, देवता आदींचा अवमान करणार्‍यांवर कठोर कारवाई होण्यासाठी ईशनिंदा प्रतिबंधक कायदा लागू करावा, प्रस्तावित ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६’ स्थगित असून यापुढे सरकारने देवभूमीचे रक्षण करणारा ‘देवस्थान भूमी संरक्षण कायदा’ लागू करावा यांसह करण्यात आलेल्या विविध ठरावांना वारकरी-भाविक यांनी ‘हर हर महादेव’च्या गजरात पाठिंबा दिला.

Post Views: 11
Previous Post

सोलापूरची वाटचाल शाश्वत पाणीपुरवठ्याच्या दिशेने

Next Post

सोलापूर विद्यापीठात प्रथम क्रमांक; सिंहगडच्या विद्यार्थ्याला सुवर्णपदक

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोलापूर विद्यापीठात प्रथम क्रमांक; सिंहगडच्या विद्यार्थ्याला सुवर्णपदक

ताज्या बातम्या

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

July 26, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

July 26, 2026
शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

July 26, 2026
जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

July 26, 2026
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

July 26, 2026
अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

July 26, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीचे निकष स्पष्ट; इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना मोठा दिलासा

July 26, 2026

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटी

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1001571

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!