Sunday, September 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

मनोरमा बँकेच्या अंत्रोळीकर नगर येथील अकराव्या शाखेचे ऑनलाईन उद्घाटन

तरुण भारतbyतरुण भारत
July 26, 2026
in solapur
0
मनोरमा बँकेच्या अंत्रोळीकर नगर येथील अकराव्या शाखेचे ऑनलाईन उद्घाटन
0
SHARES
12
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : सहकार ही केवळ आर्थिक व्यवस्था नसून सामान्य माणसापर्यंत आर्थिक सक्षमीकरण पोहोचविणारी प्रभावी चळवळ आहे. जगभरातील सहकारी संस्थांची मालमत्ता चार ट्रिलियन डॉलर असून ४११ कोटी सभासद सहकाराशी जोडले गेले आहेत. नागरी सहकारी बँकांच्या ठेवी सहा लाख कोटी रुपयांवर पोहोचल्या असून आता ग्राहकांना आधुनिक मोबाईल बँकिंगसह तंत्रज्ञानाधारित सुविधा देणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन कॉसमॉस बँकेचे चेअरमन संजीव खडके यांनी केले.
           मनोरमा को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अंत्रोळीकर नगर या  अकराव्या शाखेचे उद्घाटन रविवारी सकाळी हॉटेल बालाजी सरोवर येथे सकाळी ११.३० वाजता येथे ऑनलाइन पद्धतीने करण्यात आले. यावेळी कै. सदाशिवराव मोरे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोरमा को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे होते. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.यावेळी आमदार तथा चेअरमन लोकमंगल बँक सुभाष देशमुख, पुणे पीपल्स मल्टीस्टेट बँकेचे चेअरमन श्रीधर गायकवाड, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर मुकुंद पवार, उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर शहर उमेश पवार, जिल्हा विशेष लेखा परीक्षक वर्ग एक धाराशिवचे व्ही. व्ही. डोके यांच्यासह मनोरमा मल्टीस्टेटच्या चेअरमन शोभा मोरे, मुख्य कार्यकारी अधिकारी शिल्पा कुलकर्णी, डॉ. ऋचा मोरे – पाटील, डॉ. सुमित मोरे, धनश्री परिवाराचे चेअरमन प्रा. शिवाजीराव काळुंखे ,अविनाश महागावकर ,सांगलीचे नायब तहसीलदार जितेंद्र मोरे आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी सर्व प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन  करण्यात आले.
         प्रास्ताविक डॉ. ऋचा पाटील – मोरे यांनी केले. यावेळी त्यांनी मनोरमा बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. मागील आठ वर्षे सलग शून्य टक्के एनपीए असलेली बँक आहे. आरबीआयकडून एफएसएम दर्जा मिळालेली बँक तसेच आदर्श बँक पुरस्कार मिळालेले बँक आज 1170 कोटी व्यवसायाकडे वाटचाल करत असल्याचे सांगितले. शोभा मोरे यांनी स्वागत केले. यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार माननीय डॉ. सुमित मोरे, व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे, डॉ. ऋचा मोरे पाटील, डॉ. आदित्य पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
         आ. सुभाष देशमुख म्हणाले, बँकेचा मालक हा सभासद आहे लाभांश कमी का म्हणून तो आपल्याकडे विचारणा करतो. सातत्याने समाजाबरोबर चालण्याचे काम मनोरमा परिवार करत आहे. लोकमंगल आणि मनोरमा परिवार एकत्र आला तर सोलापुरात ती सहकारात फार मोठे क्रांती होईल. यावेळी श्रीधर गायकवाड व्हीव्ही यांनी आपले विचार मांडले.
        कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीकांत मोरे म्हणाले, मनोरमा बँकेच्या वाटचालीला आज तीन दशक होत आहेत. सहकारात काम करताना काही अडचणी आल्या. त्यावर मात करून पुढे जाणे हा अर्थकारणाचा भाग आहे.
यावेळी पल्लवी पवार यांनी सूत्रसंचालन केले. व्हाईस चेअरमन संतोष सुरवसे यांनी आभार मानले.यावेळी बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे चेअरमन ॲड. सुरेश गायकवाड, सर्व संचालक मंडळ, मॅनेजर नीलकंठ करंडे, प्रशासनाधिकारी कमलाकर पुजारी, पुरुषोत्तम साखरे, सुनील पाटील  तसेच सभासद, खातेदार, ठेवीदार यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यांचा झाला आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान
कै. सदाशिवराव रामचंद्र मोरे आदर्श शिक्षक पुरस्काराचे मानकरी असे –  वैशाली ज्ञानेश्वर कार्वेकर (जिल्हा परिषद शाळा, शेटे वस्ती तालुका उत्तर सोलापूर), निर्मला लक्ष्मण केदारलिंगे ( जिल्हा परिषद शाळा, जगताप वस्ती तालुका मोहोळ), राहुल रामू राठोड (जिल्हा परिषद शाळा, बेलाटी तालुका उत्तर सोलापूर.), चंद्रकांत पुंडलिक नवले ( जिल्हा परिषद शाळा, वाघोली तालुका मोहोळ), रमेश गोविंद जाधव( जिल्हा परिषद शाळा, इंदिरानगर कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर), विजय अच्युत गुंड (जिल्हा परिषद शाळा, गावडे वस्ती तालुका मोहोळ) आदींना पुरस्काराने सन्मानित करण्यात आला. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
Post Views: 84
Previous Post

वारकऱ्यांच्या सेवेतील उत्कृष्ट नियोजनाची राज्यस्तरावर दखल

Next Post

भीमा खोऱ्यातील धरणांतून प्रचंड विसर्ग; उजनी धरण ९०% सकाळपर्यंत होणार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
भीमा खोऱ्यातील धरणांतून प्रचंड विसर्ग; उजनी धरण ९०% सकाळपर्यंत होणार

भीमा खोऱ्यातील धरणांतून प्रचंड विसर्ग; उजनी धरण ९०% सकाळपर्यंत होणार

ताज्या बातम्या

विश्वबंधु दिनानिमित्त संस्कार वर्ग शिबिराचे उत्साहात उद्घाटन

विश्वबंधु दिनानिमित्त संस्कार वर्ग शिबिराचे उत्साहात उद्घाटन

September 13, 2026

प्रभाग क्र. ११ कुंभार गल्लीतील वर्षानुवर्षे बंद असलेला बोअर सुरू

September 13, 2026

गणेशोत्सवानिमित्त सी. बी. खेडगी महाविद्यालयात व्याख्यानमाला

September 13, 2026

बैलपोळ्याच्या मिरवणुकीत रायफलचा हवेत बार; परितेत गोळीबाराने खळबळ

September 13, 2026

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #news #marathinews #latestnews

September 12, 2026

गुन्हे शाखेने केली महत्वाची कामगिरी

September 12, 2026

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला #solapurnews #news

September 12, 2026

पोलिसांना काळजी कर्मचाऱ्यांच्या मनस्वास्थ्याची #viral #solapurnews #news #marathinews

September 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1199274

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!