सोलापूर – निरोगी शरीर, आनंदी मन आणि सकारात्मक विचार हेच ज्येष्ठांच्या सुखी जीवनाचे खरे रहस्य आहे म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी आपले आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित व्यायाम, संतुलित आहार आणि वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणे अत्यंत आवश्यक आहे असे प्रतिपादन रेवणसिद्ध रोडगीकर यांनी केले.
शेळगी येथील समर्थ ज्येष्ठ नागरिक संघावतीने आयोजित कार्यक्रमाप्रसंगी रेवणसिद्ध रोडगीकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी महेश प्रभुलिंग ठेसे, प्रकाश चडचणकर, संघाचे अध्यक्ष शिवलिंगप्पा शहाबादे, उपाध्यक्ष चंद्रकांत रमणशेट्टी, सचिव सुनील पुजारी, सहसचिव अंबादास बिराजदार, कोषाध्यक्ष शरणप्पा यारगले, संचालक अशोक खानापुरे, मल्लिनाथ कट्टे , मल्लिनाथ बताले, संचालिका कस्तुरी अक्कलकोटे ,महानंदा बावी यांच्यासह शेळगी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला उपस्थित होते. चंद्रकांत रमणशेट्टी यांनी संघाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महेश ठेसे म्हणाले, ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमांमुळे माणसा माणसांतील जिव्हाळा आणि आपुलकी वाढीस लागते. ज्येष्ठ नागरिकांनी यापुढेही अशीच एकत्र येऊन जीवनात आनंद निर्माण करावा.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील पुजारी यांनी केले तर विश्वनाथ कल्याणशेट्टी यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व देणगीदार ,संचालक, संचालिका व सदस्यांनी मोलाचे सहकार्य केले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















