बदनापूर – शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्राचे यशस्वी
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बदनापूर विधानसभा
मतदारसंघाच्या वतीने रुग्णांना फळवाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्यात
आली. रुग्णालयातील रुग्णांची विचारपूस करत त्यांच्या प्रकृतीची चौकशी
करण्यात आली तसेच त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
या कार्यक्रमात शिवसेनेचे जिल्हा संघटक भानुदास (नाना) घुगे,
उपजिल्हाप्रमुख भगवानराव कदम, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुपम घुगे,
जिल्हा समन्वयक संजूभाऊ जाधव, तालुकाप्रमुख जयप्रकाश चव्हाण,
उपतालुकाप्रमुख रामेश्वर फंड,फैजान मिर्झा, अनिस पठाण, जावेद खान, शिवाजी
मदन, सुदामराव काळे, ज्ञानेश्वर गरबडे, परमेश्वर म्हात्रे, गजानन
बोंद्रे, राहुल जर्हाड, राजू जर्हाड, बालाजी चव्हाण, केशव क्षीरसागर,
पूजा टेहरे,रामआप्पा अंभोरे, सतीश चव्हाण, अशोक चव्हाण यांच्यासह
शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमाचे रुग्ण व
त्यांच्या नातेवाईकांनी स्वागत केले. सामाजिक उपक्रमांद्वारे समाजाशी
नाते अधिक दृढ करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.
०००००००००००
फोटो अोळी……
७-बदनापूर विधानसभा मतदारसंघाच्या वतीने रुग्णांना फळवाटप करून सामाजिक
बांधिलकी जपण्यात आली. रुग्णालयातील रुग्णांची विचारपूस करत त्यांच्या
प्रकृतीची चौकशी करण्यात आली तसेच त्यांना लवकर बरे होण्यासाठी
शुभेच्छाही देण्यात आल्या.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















