अक्कलकोट – गुरुपोर्णिमा निमित्य अक्कलकोट तीर्थक्षेत्री स्वामी दर्शनार्थ भाविक मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता गृहीत धरून सुलभ कमी वेळात दर्शन व्हावे याकरिता पहाटे पासून वटवृक्ष स्वामी मंदिर खुले असणार आहे . भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता फत्तेसिंह चौका पर्यत दर्शन रांग मंडप उभा करण्यात आला आहे . वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान नपा प्रशासन पोलीस प्रशासन भाविकांच्या आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध केले आहेत .
भाविकांच्या वाहनाची कोंडी होऊ नए याकरिता पोलीस प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली आहे वाहनाची पार्किंग करिता अनेक ठिकाणी सोय केली आहे . बसस्थानक समाधी मठ . ‘ मैंदर्गी रस्ता भाविकांना फिरते प्रसाधन गृह वाहन ची सोय केली आहे .
गुरुपोर्णिमा उत्सव निमित्य वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर दर्शनार्थ पहाटे पासून खुले असणार आहे . याबरोबरच श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ , राजेराय मठ स्टेशन रस्ता, जोशी मठ टिळक गल्ली , गुरुमंदिर भारत गल्ली , बुधवार पेठ स्वामीचे समाधी मठ , बॅगेळी स्वामीचे विश्रांती धाम आदि ठिकाणी गर्दी टाळण्यासाठी भाविकांनी स्वामीचे दर्शन व धार्मिक कार्यक्रम लाभ घेऊ शकतात .
नगर पालिका प्रशासनाने भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता पालखी सोहळ्यासाठी होणारी गर्दी खबरदारी . म्हणून वाहतुकीस अडथळा ठरणारी अतिक्रमण गुरुपोर्णिमा एक दिवस पूर्वीच काढण्यात आली . मंदिर परिसरात प्रासादिक वस्तु नारळ पुष्पहार पेढे अगरबत्ती अष्ठगंध फोटो मुर्ती कंठी माळा आदि वस्तुची दुकाने थाटली आहेत .
Post Views: 9