श्रीपूर – येथिल श्रीमती लक्ष्मी लक्ष्मण भिसनाळ या महिलेस दिवसा ढवळ्या चोरट्यांनी मारहाण करत गळ्यातील सोन्याची सुमारे अर्धा तोळ्याची मण्यांची माळ हिसकावून पळवून नेली .
लक्ष्मी भिसनाळ या आपल्या मुली समवेत म्हशी पाललाने आपला कुटूंब चरितार्थ चालवतात .
म्हशीला चारा म्हणून त्या एक ते दीड किलोमिटर वर असलेल्या ओढ्या लगत गवत काढत होत्या . याला लागूनच संत तुकाराम पालखी महामार्ग गेलेला आहे . त्यामुळे येथे चांगली रहदारी असते परंतु लक्ष्मी भिसनाळ यांचेवर पाळत ठेवून व आसपास कोणी नाही याची खात्री करून चोरट्यांनी त्यांचे गळ्यातील सोन्याची माळ ओढण्याचा प्रयत्न केला त्यास त्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले परंतु चोरट्याने त्यांना जबर मारहाण करत गळ्यातील सोन्याच्या माळेला हिसका देवूनमाळ घेवून पळून गेला. रस्त्यावर मोटार सायकल घेवून थांबलेला दुसर्या साथीदारा ते पळून गेले .दिवसा ढवळ्या झालेल्या या प्रकाराने भितीचे वातावरण पसरले आहे .
Post Views: 9