बार्शी – लायन्स क्लब बार्शी टाऊन, लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनी आणि लिओ-लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन युथ यांचा संयुक्त पदग्रहण, शपथविधी व चार्टर प्रदान सोहळा रविवारी देशपांडे व्हेज हॉल, उपळाई रोड, बार्शी येथे उत्साहात संपन्न झाला. डिस्ट्रिक्ट ३२३४-डी २ चे एमजेएफ ला. सुनिताताई मालपाणी यांनी इंडक्शन ऑफिसर म्हणून, तर मल्टिपल डिस्ट्रिक्ट ३२३४चे माजी मल्टिपल कौन्सिल चेअरमन पीएमसीसी ला. गिरीश मालपाणी यांनी इन्स्टॉलिंग ऑफिसर म्हणून नूतन पदाधिकाऱ्यांना शपथ देऊन मार्गदर्शन केले.
मार्गदर्शन करताना ला. गिरीश मालपाणी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या नेतृत्वाचे उदाहरण देत संकटाच्या काळात शांत राहणे, योग्य निर्णय घेणे, संघ भावना जोपासणे आणि सेवेला सर्वोच्च प्राधान्य देणे, हे प्रत्येक पदाधिकाऱ्याचे कर्तव्य असल्याचे सांगितले. लायन्स परिवारातील प्रत्येक सदस्याने समाजहितासाठी नि:स्वार्थ सेवाभाव जपत समाजात सकारात्मक बदल घडवून आणावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमास बार्शीचे आमदार दिलीप सोपल व विधानपरिषदेचे आमदार राजेंद्र राऊत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच डिस्ट्रिक्ट ३२३४-डी १ चे द्वितीय उपप्रांतपाल पीएमजेएफ लायन मंगेश दोशी, रिजन-१चे रिजन चेअरमन एमजेएफ ला. डॉ. महेश नळे तसेच झोन-३च्या झोन चेअरमन ला. अर्चना आवटे यांची विशेष उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करुन समाजसेवा, नेतृत्व आणि युवकांच्या सहभागातून अधिकाधिक सेवाभावी उपक्रम राबविण्याचे आवाहन केले.
यावेळी लायन्स क्लब बार्शी टाऊनच्या स्पॉन्सरशिपमधून स्थापन झालेल्या लिओ-लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन युथ या नव्या क्लबचे चार्टर प्रमाणपत्र बार्शीचे आमदार दिलीप सोपल, विधान परिषदेचे आमदार राजेंद्र राऊत तसेच माजी मल्टिपल कौन्सिल चेअरमन पीएमसीसी ला. गिरीश मालपाणी यांच्या शुभहस्ते क्लबचे चार्टर अध्यक्ष लिओ ला. शुभम श्रीश्रीमाळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.
शपथविधी सोहळ्यात लायन्स क्लब बार्शी टाऊनचे अध्यक्ष ला. आदित्य कोठारी, सचिव ला. द्वारकेश डोईफोडे, खजिनदार ला. शिशिर मते व सहसचिव ला. प्रेमजी भानुशाली यांनी पदाची शपथ घेतली. लायन्स क्लब बार्शी टाऊन तेजस्विनीच्या अध्यक्षा ला. स्मिता देशमुख, सचिव ला. मालती पवार व खजिनदार ला. अंजली भानुशाली यांनी पदभार स्वीकारला. तर लिओ-लायन्स क्लब ऑफ बार्शी टाऊन युथचे चार्टर अध्यक्ष लिओ ला. शुभम श्रीश्रीमाळ (पवन), सचिव लिओ ला. उदयन सावंत, खजिनदार लिओ ला. गौरव सुराणा तसेच नूतन संचालक मंडळाने शपथ घेऊन पदभार स्वीकारला.
यावेळी नूतन पदाधिकाऱ्यांनी लिओ-लायन्स क्लबच्या माध्यमातून युवकांना समाजसेवा, व्यक्तिमत्त्व विकास आणि नेतृत्वाची नवी दिशा देत विविध सेवाभावी, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अतुल सोनीग्रा, रवी बजाज, मावळते अध्यक्ष ला. रवी राऊत, अमित कटारिया, सचिन बागमार, पंकज पाटील, ला. प्रकाश फुरडे तसेच लिओ ला. आदित्य सोनिग्रा, रोनक कुंकुलोळ, गोविंदराज बांदेवार आणि यश कुंकुलोळ ,तेजस रायचूरकर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ला. प्रकाश फुरडे व ला. शर्वरी फुरडे यांनी तर आभार प्रदर्शन ला. द्वारकेश डोईफोडे यांनी केले. कार्यक्रमास लायन्स व लिओ परिवारातील पदाधिकारी, सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 3