अक्कलकोट – मुंबई येथील स्वामी भक्त कै.दिपक साळूंखे यांच्या स्मरणार्थ येथील श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान मध्ये ज्योती साळुंखे वटवृक्ष मंदीरातील सेवेकऱ्यांना ब्लँकेटचे वाटप करून हा सेवाभावी उपक्रम श्री स्वामी समर्थांच्या चरणी अर्पण केला.
देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश मालक इंगळे यांच्या मार्गदर्शनानुसार स्वामी भक्त ज्योती साळुंखे व सहकाऱ्यांनी देवस्थान कार्यालयात हा उपक्रम राबविला.
स्वामी भक्त ज्योती साळुंखे यांनी राबविलेल्या या उपक्रमानिमीत्त
श्री स्वामी समर्थाचे आशिर्वाद म्हणून मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी ज्योती साळुंखे व सहकारी मनीषा हुले, अश्विनी कंटीकर, श्रध्दा साळूंखे, दर्शना राणे, मालती गायकवाड, आकांक्षा राणे, सरिता कुलकर्णी यांचा श्री स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला.
यावेळी बोलताना चेअरमन महेश इंगळे म्हणाले की, श्री.वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समिती ही कर्मचारी आणि सेवेकऱ्यांप्रती खुप संवेदनशील आहे. येथील मंदीरात भाविकांकडून सेवेकऱ्यांसाठी देणाऱ्या वस्तु तंतोतंत प्रत्येका पर्यत पोहोचविण्याची जबाबदारी समिती नेहमीच कटाक्षाने पाळते याचे उत्तम उदाहरण म्हणजे आजचा हा ज्योती साळूंखे यांचा सेवाभावी उपक्रम होय असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना स्वामी भक्त ज्योती साळुंखे म्हणाल्या की आमची सेवा तर खूप छोटी आहे. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे मालक हे स्वामींच्या या दिव्य सेवेकऱ्यांचा डोलारा सांभाळताना पाहून मन गहिवरून येते आणि त्या प्रेरणेतूनच फुल ना फुलाची पाकळी म्हणून आपण ही मंदीर सेवेकऱ्यांना काही तरी द्यावे ही भावना निर्माण झाली आणि त्या भावनेतूनच आज ही सेवा स्वामींचरणी अर्पण केली असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदीर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, विपूल जाधव, मनोज जाधव, शिवाजी गुजर, प्रसाद सोनार, नरेंद्र शिर्के, चंद्रकांत कवटगी, सागर गोंडाळ, काशिनाथ इंडे, गणेश इंगळे, रविराव महिंद्रकर, अविनाश क्षीरसागर, रमेश होमकर, श्रीकांत मलवे, गिरीश पवार इत्यादी उपस्थित होते.
Post Views: 10