अक्कलकोटच्या रोटरी क्लब पदग्रहण समारंभात नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन.
अक्कलकोट
रोटरी क्लबचे कार्य म्हणजे खऱ्या अर्थाने समाजसेवेचा आदर्श असल्याचे प्रतिपादन येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी केले.
आज रोटरी क्लब ऑफ अक्कलकोटच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा येथील श्रीमंत कांतामती भोसले मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन केल्यानंतर नगरसेवक महेश इंगळे बोलत होते.
पुढे बोलताना नगरसेवक महेश इंगळे म्हणाले की शिक्षण, आरोग्य, रक्तदान आणि गरजू लोकांना मदत अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून रोटरीने नेहमीच समाजापुढे एक सकारात्मक उदाहरण ठेवले आहे. सेवा हीच खरी पूजा ही रोटरीची भावना स्वामींच्या शिकवणीशी सुसंगत आहे. अशा सेवाभावी संस्थांच्या पाठीशी देवस्थान नेहमीच खंबीरपणे उभे राहील असे सांगून रोटरी क्लब ऑफ अक्कलकोटचे
आरआयडी ३१३२ च्या सन २०२६-२७ या वर्षाकरिता निवडण्यात आलेल्या त्यांच्या संपूर्ण टीमला मी मनःपूर्वक शुभेच्छा देतो असेही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लब ऑफ अक्कलकोटच्या वतीने पदग्रहण अधिकारी रो.महेशकुमार कोठारी, उपप्रांतपाल डिस्ट्रीक्ट आणि प्रमुख पाहुणे रो.जयेश पटेल यांनी आ.सचिन दादा कल्याणशेट्टी, नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी, चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे, आरोग्य सभापती तथा नगरसेवक अविनाश मडीखांबे व अन्य उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार केला.
या पदग्रहण सोहळ्यात नवनिर्वाचित अध्यक्ष संजीवकुमार किरनळ्ळी, सचिव रो.डॉ.प्रमोद सुतार, कोषाध्यक्ष रो.सागर हळगोदे, या वर्षाचे नूतन सदस्य संतोष पराणे, विजयकुमार पवार, शिवानंद कारले, राघवेंद्र पोतदार, महेश शवारी आदींसह निवडक मान्यवरांची निवड करण्यात आली.
या कार्यक्रमास प्रमुख पाहूणे म्हणून आ.सचिन दादा कल्याणशेट्टी, नगरसेवक, नगराध्यक्ष मिलन दादा कल्याणशेट्टी, नगरसेवक महेश इंगळे,
अमोलराजे भोसले, आरोग्य सभापती अविनाश मडीखांबे, पदग्रहण अधिकारी रो.महेशकुमार कोठारी, उपप्रांतपाल डिस्ट्रीक्ट रो.जयेश पटेल यांच्यासह रोटरी, रोटॅ्रक्ट सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव रो.प्रदिप तोरस्कर यांनी केले तर आभार रो.केदार नरोणे यांनी मानले.
Post Views: 4