सांगोला – नामसाधना मंडळ, सांगोला यांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला. पहाटे श्री गोंदवलेकर महाराजांना अभिषेक व काकड आरती संपन्न झाली. स.६.३० ते ८ च्या दरम्यान नामसाधना मंडळाची उपासना व गुरुजनांचा सत्कार कार्यक्रम दत्त मंदिरात पार पडला. यावेळी हभप.सुभाष लऊळकर यांनी ईश्वराच्या खऱ्या रूपाचं दर्शन ज्यांनी घडवलं त्या सद्गुरूंबद्दल मनोमन कृतज्ञता व्यक्त करण्याचा गुरुपौर्णिमा हा दिवस असतो असे सांगत नामाला वेगळे महत्त्व असल्यामुळे नामसाधनेत जास्तीत जास्त भक्तांनी सहभाग वाढवावा असे आवाहन केले. याप्रसंगी शिक्षक चारुदत्त जगताप, भागवत भाटेकर, सरला खाडे-शिर्के, सुनिल लिगाडे, औदुंबर चंदनशिवे, नूतन डांगरे, राजेश्वरी कोरे, सुनिल डिगोळे, स्नेहा महिमकर, मनोज उकळे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि.संतोष भोसले, सूत्रसंचालन विष्णू राऊत यांनी केले. संध्याकाळी हभप.वासुदेवबुवा जोशी यांचे नारदीय कीर्तनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Post Views: 13