सोलापूर – महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचा १ ऑगस्ट २०२६ रोजी होणारा वर्धापन दिन तसेच राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियानाच्या प्रारंभाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनाच्या वतीने गुरुवार, दि. ३० जुलै २०२६ रोजी मनसे मध्यवर्ती कार्यालय, सोन्या मारुती चौक, येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. या बैठकीत वर्धापन दिनाचे नियोजन, सभासद नोंदणी अभियानाची अंमलबजावणी, संघटनात्मक बांधणी तसेच आगामी उपक्रमांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेमध्ये नव्याने नियुक्त झालेल्या शहर उपाध्यक्ष वैभव रंपुरे तसेच विभागाध्यक्ष अभिषेक इरकल, गोरक्ष उपरे आणि पृथ्वीराज इंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेला अधिक बळ मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
बैठकीदरम्यान १ ऑगस्टपासून सुरू होणारे राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियान तळागाळापर्यंत प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची संघटनात्मक ताकद वाढवून आगामी काळात विद्यार्थी हिताच्या प्रश्नांवर अधिक प्रभावीपणे काम करण्याचा संकल्प करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, जैनोद्दीन शेख, अमर कुलकर्णी, संतोष घोडके, अभिषेक रंपुरे, प्रकाश कोळी, जितेंद्र टेंभुर्णीकर, गणेश पाटील, गणेश भोसले, विशाल गुजले, सागर जिडगी, द्वारकेश पटणे, इरेश करजगी, परिमल पुदाले, श्रीराज महिंद्रकर, आदित्य मातोळी आदी उपस्थित होते.

















