करमाळा – अरबाज शेख यांच्या वडिलांना 29जून रोजी हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना प्रथम करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर सोलापूर येथील एका खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दरम्यान तेथील डॉक्टरांनी औषध व गोळ्या आमच्या फार्मासिस्ट दुकानातूनच घ्याव्या लागतील अन्यथा तुमचा पेशंट घेऊन जा.. असे सांगितल्याने अरबाज शेख हा मराठी सिनेकलाकार असला त्याची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्याने नैराश्यातून या हॉस्पिटलची ऑडिओ क्लिप करून सदर रुग्णालय त्यांच्या औषधी दुकानातूनच औषधी घेण्याची सक्ती करत असल्याची पोलखोल केल्याने खळबळ माजली होती.
शिव सेना वैद्यकीय कक्ष प्रमुख व उपमुख्यमंत्र्यांची स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार अरबाज शेख यांची भेट घेऊन त्यांना उपचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एक लाख रुपयांचा धनादेश उद्योग मंत्री उदय सामंत व मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत अरबाज शेख यांना दिला व सोलापुरातील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये अरबाज च्या वडिलांना पुढील उपचारासाठी दाखल केले. तेथे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडून अरबाज शेख यांच्या वडिलांच्या उपचारासाठी दीड लाख रुपयांचा निधी देण्यात आला उपचाराअंती अरबाज शेख यांचे वडील असलम रसूल शेख यांचे आज गुरुवारी सोलापुरातील हॉस्पिटलमध्ये दुपारी निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
रात्री उशिरा करमाळा तालुक्यातील जेऊर येथील मुस्लिम कब्रस्तान मध्ये त्यांचा दफनविधी पार पडला यावेळी राजकीय सामाजिक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
Post Views: 18