सोलापूर – ॲम्युचर कबड्डी फेडेरेशन ऑफ इंडियाचे मार्गदर्शक तत्त्वे व राष्ट्रीय क्रीडा प्रशासन अधिनियम २०२५ मधील तरतुदीप्रमाणे महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या अंतर्गत क्रीडा आयोगाची स्थापना करण्यात येणार आहे.
राज्यातील ज्या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे, अशा खेलरत्न, अर्जुन, शिवछत्रपती पुरस्कार व राष्ट्रीय स्पर्धेतील पदक प्राप्त खेळाडूंना या क्रीडा आयोगात सहभागी होण्याची संधी प्राप्त होणार आहे. खेळाडू हा किमान एक वर्ष अगोदर खेळाडून निवडलेला असावा व त्याचे वय २५ वर्षांपेक्षा जास्त व ५० वर्षांपेक्षा कमी असावे. महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनला संलग्न असणाऱ्या जिल्ह्यातील पात्र व इच्छुक पुरुष किंवा महिला माजी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व छत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडूंनी १० ऑगस्ट २०२६ पर्यंत आपले अर्ज राज्य संघटनेच्या ईमेलवर अपलोड करावेत, असे आवाहन सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे सचिव मदन गायकवाड यांनी कळविले आहे.
——-





















