सोलापूर – महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सोलापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या वतीने जिल्हा कबड्डी पंच शिबिर तसेच राज्य कबड्डी पंच परीक्षेचे आयोजन रविवार दिनांक ९ ऑगस्ट रोजी करण्यात आले आहे. परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या खेळाडू किंवा विद्यार्थ्यांची पात्रता जिल्हा कबड्डी पंच परीक्षा उत्तीर्ण, बी.पी.एड परीक्षा उत्तीर्ण अथवा परीक्षार्थी, आणि राष्ट्रीय खेळाडू किंवा विद्यापीठ खेळाडू अशी असणे आवश्यक आहे. परीक्षेस बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा फी व प्रमाणपत्राची झेरॉक्ससह असोसिएशनच्या सहकार्यवाह जयंत मोरे (मो.नं. ९४२३३३१६४५) किंवा संतोष जाधव (मो.नं. ९८५०४३०३४३) यांच्याशी १ ऑगस्टपर्यंत संपर्क साधावा, असे जिल्हा कबड्डी संघटनेचे सचिव मदन गायकवाड यांनी कळविले आहे.
——–






















