अकलूज – अकलूजचे ग्रामदैवत श्री अकलाई देवीची यात्रा (भंडारा) मोठ्या उत्साहात साजरी झाली.
आषाढी पौर्णिमेनंतर येणाऱ्या पहिल्या मंगळवारी किंवा शुक्रवारी श्री अकलाई देवीची यात्रा साजरी करण्याची परंपरा आहे.
त्यानुसार आज शुक्रवारी श्री अकलाई देवीची यात्रा साजरी झाली.मंदिरात पहाटेची पूजा श्री अकलाई देवी देवस्थानच्या वतीने पुजारी गुरव बंधू यांनी केली . दुपारी १२ वाजता परंपरेनुसार श्री अकलाई देवीची पालखी फुले वाड्यातून मंदिरात वाजत गाजत आणण्यात आली. मंदिराला प्रदर्शना घालून पालखी मंदिरामध्ये ठेवण्यात आली यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी विश्वस्त जय सिंह मोहिते पाटील व त्यांच्या पत्नी सुलक्षणादेवी मोहिते पाटील यांनी पालखीचे स्वागत करून दुपारची दुपारची महापूजा मंदिर समितीचे विश्वस्त जयसिंह मोहिते पाटील व त्यांच्या पत्नी सुलक्षणादेवी मोहिते पाटील यांच्या हस्ते झाली. सकाळपासूनच मंदिरात दर्शनासाठी भाविकांना गर्दी केली होती. मंदिर समितीच्या वतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. तर पावसाचे दिवस असल्याने दर्शन रांगेकरिता भाविकांसाठी निवारा करण्यात आला होता. आलेल्या प्रत्येक भाविकास शिरा व खिरीचा प्रसाद दिला जात होता
माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील, माने पाटील, देशमुख कुटुंबीयांसह असंख्य भाविकांनी दिवसभरात अकलाई देवीचे दर्शन घेतले. यावेळी विविध गणेश मंडळे, नवरात्र मंडळे, सामाजिक संस्थांनी तसेच मुस्लिम समाज लिंगायत समाज यांनी स्वयंसेवक व प्रसादाचे वाटपाचे कार्य केले सायंकाळी मंदिर परिसरात असणाऱ्या दीपमाळ्याचे प्रज्वलन स्वरुपाराणी मोहिते पाटील यांच्या हस्ते झाले. मंदिर परिसरात आराधी गोंधळी यांनी धार्मिक कार्यक्रम सादर केले. माझी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्यासह मोहिते पाटील, माने माने पाटील देशमुख कुटुंबीयांसह असंख्य भाविकांनी दिवसभरात्री अकलाई देवीचे दर्शन घेतले. यात्रेच्या दुसऱ्या दिवशी श्री अकलाई देवीच्या पालखीचा छबिना अकलूज शहरातील प्रमुख मार्गावरून निघणार आहे दीपमाळा प्रज्वलन सायंकाळची आरती होताच फटाकेचे आदेश बाजी व सुंदर असे दारू काम करण्यात आले हे मनमोहक दृश्य नागरिकांनी अनुभवले मंदिर पूर्ण फुलांनी सजवले होते तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती पंचक्रोशीतील लाखो भाविकांनी दर्शन घेतले या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांसाठी वेगळी व्यवस्था कितीही गर्दी झाली तरी 15 ते 20 मिनिटात देवीचे दर्शन होत होते आणि प्रत्येकाला प्रसाद दिला जातो देवीचे पुजारी मोहन गुरव मदन गुरव अनिरुद्ध गुरव याचबरोबर गुरु परिवारातील सदस्यांनी श्रीदेवीचे पूजा मांडली अभिषेक केले . नीरा नदीच्या काठावर असणारे श्री अकलाई देवीचे मंदिर भाविकांची श्रद्धास्थान व पर्यटन केंद्र म्हणूनही परिचित आहे.