अक्कलकोट – अक्कलकोटहून राज्यभरामध्ये एक पाऊल अध्यात्माकडे घेऊन जाणाऱ्या समर्थनगरी प्रतिष्ठानच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता आलेल्या स्वामीभक्तांना शिरा व उपीट याचे २००० पॉकेट महाप्रसाद वाटप करण्यात आला.
मागील वर्षात गुरुपौर्णिमा दिवशी झालेली गर्दी लक्षात घेऊन समर्थ नगरी परिवाराचे मार्गदर्शक महेश क. इंगळे ( चेअरमन श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान ) व वे .शा.सं. अण्णू महाराज (श्री स्वामी समर्थ समाधी मठ ) यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थापक अध्यक्ष सैदप्पा इंगळे यांच्या नियोजनुसार रात्रभर प्रवास करून आपल्या चिमुकल्या मुलासह स्वामी समर्थांच्या दर्शनाकरिता रांगेत उभे असलेल्या स्वामी भक्तांना दर्शन झाल्यावर स्वामी रुपी महाप्रसादाचे समाधान मिळावे व योग्य जागेत बसून प्रसाद घेता यावा या उद्देशाने सिल्वर कोटिंग पॅकिंग मध्ये गरम शिरा व उपीटचे पॉकेट वाटप करण्यात आले . सकाळी १०:३० पासून महाप्रसाद वाटपास सुरुवात करण्यात आली .स्वामी भक्तानी महाप्रसादाचा लाभ घेऊन समाधान व्यक्त केला.
याप्रसंगी श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिराचे प्रथमेश इंगळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र टाकणे, पोलीस निरीक्षक अविनाश पवार ,पत्रकार संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर ,ज्येष्ठ पत्रकार मारुती बावडे ,शिवानंद फुलारी, मुख्याधिकारी रमाकांत डाके, प्रतिष्ठित व्यापारी बसवराज माशाळे ,रोटरी क्लबचे नूतन अध्यक्ष सचिन किरनळ्ळी, राजू एकबोटे ,श्रीशैल हुंडेकरी, पत्रकार नंदकुमार जगदाळे, विश्वनाथ चव्हाण,चेतन जाधव, स्वामीराव गायकवाड ,महेश भंडारी , योगेश कबाडे , अभिजीत पत्की , पीएसआय दत्तात्रय घंटे ,कावेरी धरणे ,अश्विनी शिंपी, मदन होटकर, कृष्णा होटकर आधीनी भेट देवून महाप्रसाद वाटप केला.
चौकट – समर्थनगरी परिवाराच्या माध्यमातून मागील अनेक वर्षापासून अक्कलकोटसह राज्यभरामध्ये स्वामीनामप्रसार व नामस्मरणाची गोडी लावण्याचे कार्य चालू आहे. एकत्रित नामस्मरणसेवा घेण्याचे कार्य या संस्थेच्या वतीने होत असल्याचे पाहून समाधान वाटते. श्रीगुरु पौर्णिमेच्या दिवशी भक्तांना महाप्रसाद सेवा देऊन अध्यात्मासह सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य संस्थेने केले आहे . = बाबासाहेब निंबाळकर ( पत्रकार संघटना अध्यक्ष अक्कलकोट )
ही सेवा पूर्णत्वास नेण्याकरिता अष्टवक्र मित्र मंडळ ( गुरुदेव ) पुणे, राहुल होटकर ,कुमार पतंगे ,सुभाष तारापुरे, नागू कोळी, सचिन गजाकोस , श्रीपाद इंगळे , प्रसाद इंगळे आदीसह सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतला .
फोटो – महाप्रसाद वाटप करताना उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र टाकणे, प्रथमेश इंगळे, बाबासाहेब निंबाळकर,व पत्रकार बांधव .
Post Views: 7