बार्शी – धसपिंपळगावचा पौराणिक वारसा मानल्या जाणाऱ्या महादेव मंदिराच्या जर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आले असताना जन्मभूमी प्रतिष्ठानच्या कार्यावरचा गावकऱ्यांचा विश्वास आणि आदर वाढविणारे प्रसंग घडत असून आयुष्यभर स्वाभिमानाने शाळेचे सेवक म्हणून काम करणारे महादेव मास्तुद यांनी वाढदिवसानिमित्त महादेव मंदिराच्या उभारणीस रुपये ५,०००/- देणगी दिली असून ही गंगाजळी रंग कामासाठी वापरली जावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
सार्वजनिक जीवनामध्ये अन्यायावर तुटून पडणारे सामाजिक कार्यकर्ते अशी महादेव मास्तुद त्यांची ओळख असून त्यांनी आपला सेवेचा बाणा या देणगीच्या निमित्ताने जपला असून त्यांच्या या श्रद्धा आणि भक्तीने दिलेल्या देणगीमुळे गावातील भाविक ग्रामस्थांनी मास्तुद यांचा भर पावसात केक कापून, पुष्पहार घालून, फटाक्यांची आतिषबाजी करत जन्मभूमी ग्रामविकास आघाडीचे प्रमुख पै. सचिन (बापू) धस व पै. धनाजी वाघमोडे यांच्या हस्ते सत्कार केला.
यावेळी जन्मभूमी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अण्णासाहेब पाटील, दादासाहेब कसबे, राहुल धस, राम देवकते, नकुल जगदाळे, गुलाब धस, दिनेश धस, राम गरड, समाधान पवार, पांडू लोमटे, भाऊसाहेब पुंड, गणेश जाधव, दादा वीर, सलीम मुलानी आदी मान्यवर उपस्थित होते.
Post Views: 4