सांगोला, – माजी आ.गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त महूद (ता.सांगोला) येथे रविवार दि.९ ऑगस्ट रोजी स.९ वा. फीनिक्स शाळा, महूद यांच्यावतीने जिल्हास्तरीय बुद्धिबळ आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बुद्धिबळ स्पर्धा इ.१ ते ४ आणि ५ वी ते खुला गट अशा दोन गटात होणार आहेत. यासाठी प्रथम २ हजार १, द्वितीय १ हजार ५०१, तिसऱ्या क्रमांकासाठी १ हजार १ रुपये आणि स्मृतीचिन्ह अशी बक्षिसे दिली जाणार आहेत. वक्तृत्व स्पर्धेसाठी माजी आ.भाई गणपतरावजी देशमुख यांचे चरित्र हा विषय निश्चित करण्यात आला आहे. यासाठी इ.१ ते ४ च्या गटासाठी प्रथम ७०१, द्वितीय ५०१, तृतीय ३०१ तसेच इ.५ ते ८ आणि इ.९ ते खुला गटासाठी प्रथम २ हजार १, द्वितीय १ हजार ५०१, तिसऱ्या क्रमांकासाठी १ हजार १ रुपये व स्मृतीचिन्ह अशी बक्षीसे देण्यात येणार आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी अधिक माहितीसाठी ९७६७५८३५३०, ७५८८५०५७२२, ९६५७६४६६४७, ९५२७५३२३८२ या क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच मागील वर्षी प्रथम क्रमांक आलेल्या स्पर्धकांना यावर्षी सहभागी होता येणार नाही, असे संयोजकांनी स्पष्ट केले आहे.
Post Views: 5