सोलापूर – रोहतक (हरियाणा) येथे झालेल्या १३व्या राष्ट्रीय कराटे, जुडो व तायक्वांदो स्पर्धेत येथील रुद्रशक्ती गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी ६ सुवर्ण आणि २ कांस्य अशी ८ पदके पटकावली.
सर्व यशस्वी खेळाडूंना मुख्य प्रशिक्षक विवेक मिस्कीन यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या या यशाबद्दल स्टुडंट ऑलिम्पिक असोसिएशन सोलापूरचे सचिव नागेश शेट्टीकर, राज्याचे सचिव सुनील शिंदे आणि रुद्रशक्ती गुरुकुलचे संस्थापक अध्यक्ष योगीनाथ फुलारी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.
खेळाडूंची पदकनिहाय कामगिरी:
कराटे : श्रद्धा इप्पनपल्ली (सुवर्ण), प्रवलिका कामूर्ती (कांस्य), तायक्वांदो : श्रावणी गवळी (सुवर्ण). जुडो : दुर्वा रोहिटे, मान्यता रोहिटे, वेदश्री गुडूर, वैभव माडे ( सर्व सुवर्ण ). कुस्ती : यतिराज भोसले (कांस्य).
























