बार्शी – वखारिया विद्यालय, उपळे दुमाला येथील सेवक मिलिंद शिवाजीराव सुरवसे हे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा सत्कार सोहळा विद्यालयात उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे मुख्याध्यापक दयानंद रेवडकर सर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून पं. स. चे माजी सदस्य विलास गाटे आणि जनसंपर्क अधिकारी कैलास नेवाळे उपस्थित होते.
या कार्यक्रमात रोहिणी डोईफोडे, रुकसार बागवान, बुरगुटे मॅडम, यश पवार व सारिका बुरगुटे यांचाही सत्कार करण्यात आला.
सत्कारमूर्ती श्री. मिलिंद शिवाजीराव सुरवसे (मामा) यांचा प्रशालेच्यावतीने संपत्नीक सत्कार करण्यात आला व त्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
Post Views: 6