सांगोला – विद्यामंदिर प्रशाला व ज्यु.कॉलेजचे प्राचार्य चारूदत्त दिगंबर जगताप यांना एकनाथ स्वाभिमानी शिक्षक सेना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सांगोला येथे आयोजित समारंभात आरोग्यदूत मंगेश चिवटे आणि शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या हस्ते चारूदत्त जगताप यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. चारूदत्त जगताप यांच्या शैक्षणिक, क्रीडा आणि प्रशासकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल घेत या अगोदरही त्यांना तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ॲड.विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक काकासो नरूटे, शुभांगी घोंगडे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.