ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमधील इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीच्या कु. ए. एस. पाटील, कु. एस. एम. पठाण आणि कु. आर. बी. पवार यांनी प्रा. पी. बी. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘व्हिकल स्पीड डिटेक्शन सिस्टीम’ (Vehicle Speed Detection System) हा नाविन्यपूर्ण प्रकल्प विकसित केला आहे. या प्रकल्पासाठी प्रकल्प समन्वयक प्रा. आर. बी. बिराजदार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या प्रणालीमध्ये सेन्सर तंत्रज्ञान, मायक्रोकंट्रोलर आधारित नियंत्रण प्रणाली, डिजिटल स्पीड मापन आणि रिअल-टाइम डेटा प्रक्रिया तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. याद्वारे वाहनांचा वेग अचूकपणे मोजता येतो आणि वेगमार्यादा उल्लंघन करणाऱ्या वाहनांची माहिती त्वरित मिळवणे शक्य होते. रस्ते अपघात कमी करणे, वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी करणे आणि स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापनात मदत करणे हे या प्रकल्पाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. विद्यार्थ्यांच्या या समाजोपयोगी उपक्रमाचे संस्थेमार्फत कौतुक करण्यात आले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. एस. ए. पाटील, सचिव श्री. एस. एस. पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार आणि विभागप्रमुख डॉ. आर. व्ही. दरेकर यांनी सर्व विद्यार्थी आणि प्रकल्प मार्गदर्शक प्रा. पी. बी. साबळे यांचे अभिनंदन केले.
*फोटो ओळी:- विद्यार्थ्यांसमवेत प्रकल्प मार्गदर्शक प्रा. पी.बी.साबळे व प्राध्यापक वृंद*
Post Views: 8