माळशिरस – गोदबा पाटील प्रतिष्ठाण संचालित कुस्तीप्रशिक्षण केंद्र, खुडूसचा मल्ल पै. हनुमंत जाधव याने जागतिक कुस्ती स्पर्धेत कास्य पदक मिळवून गोदबा पाटील कुस्ती केंद्राचे नाव जागतिक पातळीवर नेले आहे .त्याच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पै. हनुमंत राजेंद्र जाधव 45 किलो वजन गटात U 17 , लखनऊ (उत्तर प्रदेश ) येथे झालेल्या , वर्ल्ड चॅम्पियनशिप निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत त्याने .सूर्य फोगट दिल्ली 0.10 , वंश हरियाणा 4.12 , व फायनल कुस्ती साहिल हरियाणा 6.10 या राज्यातील मल्लांवर विजय संपादन करून सुवर्ण पदक मिळविले होते त्याची अझरबैजान (बाकू) या देशात होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियन कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली होती .
नुकत्याच अझरबैजान (बाकू) या देशात झालेल्या वर्ल्ड चॅम्पियन कुस्ती स्पर्धेत कजा किस्तान,इराण, येथील मल्लावर मात करीत कास्य पदक मिळविले .
त्याच्या या यशाबद्दल पालकमंत्री ना . जयकुमार गोरे माजी आमदार राम सातपुते श्री श्री साखर कारखान्याचे चेअरमन शेषागिरीराव .माजी सभापती मच्छिंद्र ठवरे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .
गोदबा पाटील कुस्ती केंद्रात सुमारे दोनशे मल्ल सराव करतात अनेक मल्लानी राज्यस्तरीय व देशपातळीवर कामगिरी केली आहे . ग्रामीण भागातील कुस्ती केंद्र इतरांना प्रेरणादायी ठरत आहे पैं हनुमंत जाधव यास एनआयएस कुस्ती कोच पै. महादेव ठवरे कोच बापूराव ठवरे., कुस्ती कोच सागर वाघ, भैय्या गोफणे ,सुरज मुलांनी ,कुस्ती कोच तुषार झंजे, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे .
चौकट
राजेंद्र जाधव ,वडील
पै .हनुमंत जाधव हा मल्ल चांदज ता . माढा येथील असून तो खुडूस येथे गोदबा पाटील प्रशिक्षण केंद्रात सराव करीत आहे.त्याचे आजोबा अंकुश जाधव यांना कुस्तीची आवड होती. . मोलमजुरी करून त्यास त्याचा खर्च करीत आहे.त्याने जिद्दीने यश यश संपादन केले याचा आम्हाला अभिमान आहे .
Post Views: 4