मंगळवेढा – स्वरसम्राट किशोरकुमार यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त सुरसंगम ग्रुप,मंगळवेढाच्यावतीनेमंगवारी सायंकाळी 7.00 वा. त्यांना
संगीतमय आदरांजलीवाहण्यातआली. त्यांनी गायलेल्या गीतांवर आधारीत ए शाम मस्तानी या कार्यक्रमाचे उदघाटन बॉलीवूडचे महागायक शब्बीरकुमार यांच्या हस्ते व तहसीलदार मदन जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
सदर कार्यक्रमात सुरसंगम ग्रुपचे दिगंबर भगरे, विजय खवतोडे, सायली साठे, नवनाथ सावळे, रफिक शेख, संतोष ढावरे, लक्ष्मी माने, रेखा कांबळे यांनी भोले ओ भोले, मेरी प्यारी बहनीया, ऐ दुनिया तुझको सलाम, देखा एक ख्याब तो, ए शाम मस्तानी, तेरा साथ है कितना प्यार, पन्ना की तमन्ना है, तुझ संग प्रित लगायी, रिम झिम गिरे सावन, ओ मेरी जान, शिशे की उम्र प्याले की, हवा के साथ साथ, जिसका मुझे था इंतजार, सलाम ए इश्क, लेकर हम दिवाना दिल, बने चाहे दुष्मन, तेरे बिना जिंदगीसे ही गीते कराओके ट्रॅकवरती सादर केली.
या कार्यक्रमास अॅड.भारत पवार, धनंजय खवतोडे, शिवाजी काशिद, सिध्देश्वर भगरे, दावल इनामदार, निलकंठ कुंभार, प्रा.शशिकांत जाधव,लहू ढगे, सचिन इंगळे, सचिन डोरले, हरिप्रसाद देवकर, बालाजी टुले,आदी रसिक उपस्थित होते. सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन नवनाथ सावळे यांनी केले.