पंढरपूर – जन्माचे सार्थक करणारी आषाढी वारी नुकतीच पार पडली. मात्र या आषाढी वारी मध्ये रात्र दिवस कडक बंदोबस्त ठेवून भाविक आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी राबणाऱ्या पोलीस बांधव आणि पत्रकार मंडळी यांना श्रम परिहार भोजनाची मेजवानी श्री पांडुरंगअन्नछत्र मंडळ आणि यांच्या वतीने विजापूर गल्ली येथील श्री पांडुरंग भवन येथे देण्यात आली,
यावेळी श्री पांडुरंग भवनचे अनिरुद्ध पाटील,समाजसेवक तसेच नामवंत कलाकार श्रीकांत महाजन बडवे आणि अक्षय बडवे उपस्थित होते. यावेळी सर्व पोलिस बांधव, पत्रकार यांचा श्री विठ्ठलाचा फोटो, शाल, श्रीफळ, टॉवेल आदी देऊन यथोचित सत्कार देखील करण्यात आला.श्री पांडुरंग भवनचे अनिरुद्ध पाटील यांचे आदरातिथ्य पाहून सर्व पोलीस भारावून गेले.
गेल्या अनेक वर्षांपासून हा उपक्रम ते चालवित असून मिष्टान्न भोजनाचा सोहळा साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी साडे तीन हजार पोलीस बांधव यांनी या महाप्रसाद भोजनाचा लाभ घेतला.
Post Views: 13