मंगळवेढा – बालरंगभूमी परिषद,मध्यवर्ती मुंबई यांच्या वतीने आणि शाखा मंगळवेढा आयोजीत इतिहास महाराष्ट्राचा-2026 या राज्यस्तरीय महोत्सवांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित एकपात्री,
नाट्यछटा, स्वगत, समूह सादरीकरण, नृत्य व संगीत या विविध कलाप्रकारांच्या प्राथमिक फेरीचे
आयोजन बालरंगभूमीपरिषद मंगळवेढा शाखेच्या
अध्यक्षा तथा नाट्यपरिषद मुंबईच्या नियामक मंडळ
सदस्या.प्रा.तेजस्विनी कदम यांच्या अध्यक्षतेखाली
उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
एकल गट क्रमांक एक मध्ये श्रीरंग गणपती
पवार-न.पा. शाळा क्रमांक.1 तर एकल गट
क्रमांक दोन मध्ये संकष्टी कागवाडकर इंग्लिश
स्कूल,मंगळवेढा हे बाल कलावंत व मी अहिल्या
होणार हे समुह नृत्यनाट्य अहिल्यानगर येथे होणार्या
स्पर्धेत सोलापूर जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.
अशी माहिती बालरंगभूमी परिषदेचे प्रमुख कार्यवाह
अशपाक काझी यांनी दिली आहे.
या प्रसंगी नाट्यपरिषद मंगळवेढा शाखेचेअध्यक्ष आमचे मार्गदर्शक डॉ.सुभाष कदम,बालरंगभूमी परिषद, शाखा:मंगळवेढाच्या अध्यक्षा प्रा.तेजस्विनी कदम, प्रमुख अतिथी परीक्षक म्हणून नाट्यकलावंतअभिनेता दयासागर देशमाने,साहित्यिक व गझलकारगणेश यादव, बालरंगभूमीपरिषद मंगळवेढाचे
उपाध्यक्ष यतिराज वाकळे तसेच योगशिक्षक
शिवकुमार स्वामी,निवेदक तथा मंगळवेढा शाखेचे
सहकार्यवाह बालाजी शिंदे,नाट्यकलावंत पूर्वा
नागणे,नृत्यदिग्दर्शिका सारिका चव्हाण,सरस्वती क्षी
रसागर,बालरंगभूमीपरिषद,मंगळवेढा शाखेचे रमेश
गदळे, मनोहर मुंडे तसेच गणपत पवार,कविता
कागवाडकर आदी स्पर्धकांचे पालक ऊपस्थित होते
बालरंगभूमी परिषदेच्या मध्यवर्ती शाखेच्या
अध्यक्षा मा. नीलमताई शिर्के-सामंत यांच्या
संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवात विद्यार्थ्यांनी
अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचे
प्रभावी कलात्मक सादरीकरण करत महाराष्ट्राची
संस्कृती, इतिहास आणि मूल्यांचा वारसा नव्या
पिढीपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या ऊपक्रमातून
करण्याचा प्रयत्न केला स्पर्धकांनी केल्याचे दिसून
आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी नटराजाच्या प्रतिमेचे पूजन
मान्यवर व बालकलाकारांच्या हस्ते करण्यात आले.
प्रास्ताविकात सह कार्यवाह बालाजी शिंदे यांनी
बालरंगभूमी परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती
देत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सभासद नोंदणी करून
वर्षभरातील उपक्रमांमध्ये बालकलाकारांनी सहभागी
व्हावे, असे आवाहन केले.
प्रमुख अतिथी नाट्यकलावंत पूर्वा नागणे हिने
बालकलाकारांना अभिनय, संवादफेक, शब्दोच्चार,
आवाजातील चढ-उतार आणि रंगमंचावरील
सादरीकरण याबाबत मार्गदर्शन केले. परिक्षक
गणेश यादव,दयासागर देशमाने यांनी कलाकारांना
नियमावलीचे पालन करत उत्कृष्ट सादरीकरणासाठी
मोलाचे मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय भाषणात प्रा. तेजस्विनी कदम यांनी
बालरंगभूमी परिषद हे बालकलावंतांसाठी प्रभावी
व्यासपीठ असून आपली मंगळवेढा शाखा नवनवीन
कलाकार घडविण्याच्या दृष्टीने
व्यक्तिमत्त्व विकासशिबिरे,अभिनय
कार्यशाळा,नृत्य-नाट्यप्रशिक्षण अशा विविध
माध्यमातून प्रयत्नशील असते. अशा उपक्रमामध्ये
विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे
आवाहनही केले.स्पर्धेसाठी प्राचार्य रविन्द्र
काशिद,प्राचार्य कल्याण भोसले,शिक्षकनेते संजय
चेळेकर गुरुजी यांचे विशेष सहकार्य लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी शिंदे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बालरंगभूमी
परिषदेच्या कार्यकारिणी सदस्य रमेशगदळे,मनोहरमुंडे,सरस्वती क्षीरसागर,सारिकाचव्हाण,शिवकुमार स्वामी तसेच मंगळवेढा शाखेचे पदाधिकारी व
सभासदांनी परिश्रम घेतले.