वळसंग – वळसंग (ता. दक्षिण सोलापूर) :येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळेच्या विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणात मदत व्हावी आणि त्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा या उद्देशाने, शाळेचे माजी विद्यार्थी ॲड. बसवराज शिवलिंगप्पा कोडले आणि कोडले परिवाराच्या वतीने शाळेला आधुनिक साऊंड सिस्टीम भेट देण्यात आली.या कार्यक्रमाचे आयोजन वळसंग येथील कन्नड शाळेत करण्यात आले होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे आणि आधुनिक साधनांची मदत व्हावी, या सामाजिक भावनेतून कोडले परिवाराने हे कौतुकास्पद पाऊल उचलले आहे. या साऊंड सिस्टीमचा वापर डिजिटल वर्गखोल्या, सांस्कृतिक कार्यक्रम आणि परिपाठासाठी केला जाणार आहे.याप्रसंगी वळसंग गावचे माजी उपसरपंच स्वामीनाथ कोडले, विद्यमान उपसरपंच समीर कटरे, ग्रामपंचायत सदस्य मलकाप्पा कोडले, शालम आमलीचुंगे, सर्वांग कोडले, सिद्धाराम तीपरादी, बसवराज किणगी, आकाश बशेट्टी, मल्लिनाथ ढब्बे, कुंभार, सिद्धाराम वाघमारे उपस्थित होते.तसेच पत्रकार कल्लय्या स्वामी, वीरेश बागलकोटी, सिद्धाराम सुतार यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक संजीवकुमार सुतार, लिंगराज गणेश व इतर शिक्षकवृंद उपस्थित होता. शाळेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्याने दाखवलेल्या या दातृत्वाबद्दल मुख्याध्यापक आणि ग्रामस्थांनी कोडले परिवाराचे विशेष आभार मानले.
Post Views: 9