पंढरपूर – श्री. दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे संस्थापक सचिव कै.कृ.श्री.क्षीरसागर यांच्या २३ व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे प्राचार्य डॉ.यू.आर.मुंढे यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे जेष्ठ संचालक अनिरुद्ध सालविठ्ठल हे होते तसेच प्रमुख पाहुणे म्हणून स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संस्थापक डॉ.बी.पी रोंगे यांनी के.एस क्षीरसागर यांचे योगदान आपण कधीच विसरू शकत नाही त्यांचे कार्य आदर्शयुक्त आहे असे प्रतिपादन केले.
या यावेळी संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर,ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे, संचालिका सुनिता मोरे,जवाहर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ.मंदार सोनवणे, उत्तमराव पाटील, डॉ.सौरभ सोनवणे, दत्त विद्या मंदिर सुस्तेचे प्राचार्य अविनाश कटकधोंड, आश्रम शाळा वाखरीचे मुख्याध्यापक एस.व्ही.कांबळे,कारंड, उपप्राचार्य ई.जी.शिंदे, विवेक वर्धिनीचे पर्यवेक्षक ए.ए.पवार, एन.टी देवकते,प्रा.तुकाराम मस्के,दत्त विद्यामंदिर सुस्तेचे पर्यवेक्षक सुरेश कट्टे,ज्येष्ठ पत्रकार सिद्धार्थ ढवळे, एम.के क्षीरसागर हे उपस्थित होते. यावेळी सुरेखा कुलकर्णी, व्हि.डी.चौगुले,विक्रम बिस्किटे यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचाही स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. एम.यू.जरे व एस.एम.शितोळे यांनी केले तर आभार प्रतिष्ठानचे अध्यक्ष भाऊसाहेब जगताप यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विवेक वर्धिनी,दत्त विद्या मंदिर सुस्ते, वाखरी आश्रम शाळा या शाळांचे सर्व पदाधिकारी शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी ,विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 8