Tuesday, September 22, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

उजनी प्रदूषणमुक्ती, आयटी पार्क, टुरिझम सर्किटवर भर

तरुण भारतbyतरुण भारत
August 6, 2026
in solapur
0
उजनी प्रदूषणमुक्ती, आयटी पार्क, टुरिझम सर्किटवर भर
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उजनी धरणाचे प्रदूषणमुक्ती अभियान, अत्याधुनिक आयटी पार्क, धार्मिक पर्यटन सर्किट, विमानसेवेचा विस्तार, उड्डाणपूल आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी ‘व्हाय सोलापूर?’ या ब्रँडची उभारणी अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा रोड मॅप तयार असून हे सर्व प्रकल्प मिशन मोडवर राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिली.
         सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी विचारमंचावर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.
           उजनी धरणातील वाढते प्रदूषण ही गंभीर समस्या असून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच धरणातील पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना केल्या जातील. कॅट फिश व सकर फिशसारख्या आक्रमक माशांच्या जातींवर नियंत्रण ठेवून देशी माशांच्या संवर्धनालाही प्राधान्य दिले जाणार आहे.सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाच्या विकासासाठी मोठी क्षमता असून अक्कलकोट, पंढरपूर, बार्शीसह विविध तीर्थक्षेत्रांना जोडणारे ‘रिलिजियस टुरिझम सर्किट’ विकसित करण्याचा आराखडा तयार केला जात आहे. यामुळे पर्यटनासोबत स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
        आयटी पार्कबाबत बोलताना त्यांनी ‘टर्नकी’ मॉडेलवर भर दिला. होटगी परिसरातील जागा आयटी पार्कसाठी उपलब्ध झाली असून एमआयडीसीमार्फत सर्व पायाभूत सुविधा उभारून कंपन्यांना तयार इमारती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. सोलापूरकडे जमीन, वीज, पाणी आणि प्रशिक्षित मनुष्यबळ ही उद्योगांसाठी आवश्यक चारही बलस्थाने असल्याने आयटी उद्योगांसाठी शहर स्पर्धात्मक ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.
         गुंतवणूक वाढविण्यासाठी केवळ सुविधा पुरेशा नसून सोलापूरचे प्रभावी ब्रँडिंग आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी ‘व्हाय सोलापूर?’ ही स्वतंत्र गुंतवणूक प्रोत्साहन मोहीम राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. यासाठी विशेष इन्व्हेस्टमेंट प्रमोशन कंपनीची मदत घेऊन देशातील विविध औद्योगिक केंद्रांमध्ये सोलापूरची क्षमता मांडली जाणार आहे.
होटगी रोड विमानतळावर नाईट लँडिंगसाठी काही तांत्रिक अडथळे असले तरी बोरामणी विमानतळ प्रकल्पासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुमारे ४०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पातून भविष्यात नाईट लँडिंगसह विमानसेवा सुरू होऊ शकते. तसेच शहरातील वाढती वाहतूक लक्षात घेऊन जुना बोरामणी नाका ते पत्रकार भवन मार्गे बाजार समिती–हैदराबाद रोडपर्यंत उड्डाणपूल उभारण्याचा मार्ग मोकळा झाला असून भूसंपादनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.पंढरपूर कॉरिडॉरसाठी राज्य शासनाने मंजुरी दिली असून भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होणार आहे. आगामी आषाढी वारीत अंध, ज्येष्ठ नागरिक आणि शारीरिकदृष्ट्या अशक्त भाविकांसाठी स्वतंत्र सुलभ दर्शन व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले.
         सोलापूर हा राज्यातील लोकसंख्या आणि मतदारसंख्येच्या दृष्टीने पाचव्या क्रमांकाचा जिल्हा असूनही कृषीव्यतिरिक्त रोजगारनिर्मिती करणारे उद्योग अपेक्षित प्रमाणात वाढले नाहीत. त्यामुळे उद्योग, पर्यटन आणि सेवा क्षेत्राच्या माध्यमातून जिल्ह्याचा जीडीपी आणि मानवी विकास निर्देशांक उंचावण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
       आषाढी वारीबाबत बोलताना कार्तिकेयन म्हणाले की, श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या सेवेसाठी वारीच्या काळात स्वतः दहा दिवस उपवास केला. वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी ही आयुष्यातील मोठी प्रेरणा असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.
वारी ही प्रशासनाची अग्निपरीक्षा :
वारकऱ्यांनी व्यवस्थापनाचे केले कौतुक
पंढरपूरची आषाढी वारी ही कुंभमेळ्यानंतर जगातील सर्वात मोठी धार्मिक मानवी गर्दी असलेली यात्रा असून यंदा सुमारे ३२ लाख भाविकांनी सहभाग घेतला. एवढी मोठी गर्दी अल्प कालावधीत हाताळणे ही प्रशासनासाठी मोठी अग्निपरीक्षा असते.
वारीच्या नियोजनात सोलापूर आणि पंढरपूरमधील पत्रकारांनी दिलेले सहकार्य मोलाचे ठरल्याचे त्यांनी नमूद केले. विशेष व्हॉट्सॲप यंत्रणा तयार करण्यात आली होती.
वारीचे यश हे कोणत्याही एका व्यक्तीचे नसून संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषद, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक शाखा, महसूल विभाग आणि इतर सर्व विभागांनी उत्कृष्ट समन्वयाने काम केले. वारीच्या शेवटच्या टप्प्यात अनेक वारकऱ्यांनी स्वतःहून थांबून यंदाच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले. वारकऱ्यांकडून मिळालेला हा सकारात्मक प्रतिसादच संपूर्ण प्रशासनासाठी सर्वात मोठा सन्मान असल्याची भावना जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी व्यक्त केली.
Post Views: 62
Previous Post

आकांक्षित तालुक्यांच्या विकासाला गती; ३८ निर्देशांक वेळेत पूर्ण करा : सीईओ कुशल जैन

Next Post

विवेक वर्धिनी येथे कै.कृ.श्री.क्षीरसागर यांना विनम्र अभिवादन

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
विवेक वर्धिनी येथे कै.कृ.श्री.क्षीरसागर यांना विनम्र अभिवादन

विवेक वर्धिनी येथे कै.कृ.श्री.क्षीरसागर यांना विनम्र अभिवादन

ताज्या बातम्या

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

आय एमआयएस’च्या आव्यन  पुलगमचे विभागीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी निवड

September 21, 2026
पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

पेशवेकालीन गणपती मंदिर उजव्या सोंडेचा नवसाला पावणारा गणपती 

September 21, 2026
सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

सीमाताई आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त माढ्यात १०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

September 21, 2026
शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

शालेय वुशु स्पर्धेत संगमेश्वर कॉलेजला  ६ पदके 

September 21, 2026

सर्कल-तलाठ्याला निलंबित करा, अन्यथा २२ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘हलगी-नाद’ मोर्चा धडकणार!”

September 21, 2026
माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

माढा महाविद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा.

September 21, 2026

मंद्रूप परिसरात परतीच्या पावसामुळे अंशतः दिलासा

September 21, 2026
श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

श्रमदानातून समाजप्रबोधन; मंद्रूपच्या गणेशोत्सव मंडळांची स्मशानभूमीत स्वच्छता

September 21, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1243999

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!