पंढरपूर – यंदाची आषाढी वारी उत्तम भरली असल्याने पंढरपूर शहराचे अर्थकारण चांगले झाले आहे. यावर्षी आषाढी वारी मध्ये सुमारे ३२ लाख भाविक आले होते असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. आषाढी वारीमध्ये बाल गोपाळासह अनेकाचे आकर्षण असलेले मिनी एस्सेल वर्ल्ड पंढरी नगरीत अवतरले असून या मायावी अद्भूत मनोरंजननगरी कडे यात्रे दरम्यान हजारो भाविकांनंतर आता सध्या पंढरपूरवासियांची पावले आपसूकच वळवत आहे.
——————–
चौकट : ( मायावी नगरीचे दरवर्षी असते कुतुहल )
उंचच उंच आकाशपाळणा हे सर्वांत आकर्षणाचा बिंदू असतो. इलेक्ट्रिक जनरेटरच्या शक्तीवर गोलगोल फिरणारा आकाशपाळणा जेव्हा उंचावर जातो त्यावेळी आसमंतातून स्वप्ननगरी पंढरपूर शहराचे सौंदर्य काही अलौकिक भासते.
——————–
चौकट : ( पंढरी नगरीचा नजारा रात्रीच्या वेळी असतो काही ओरच )
हा आकाशपाळणा वेगाने खाली येतो तेव्हा पोटात गोळा येऊन अनेक नवखे घाबरून ओरडायला जागतात, आनंद, जोश, अनोजे थ्रिल अशा त्रिवेणी संगमाचा अनुभव माविकासह शहरवासीय अनुभवत आहेत. खिशाला परवडेल अशा माफक दरात विविध राईड्स असल्यानं गरीब, सर्वसामान्य ते अगदी श्रीमंत घरातील मंडळी याचा मुक्त आनंद घेताना दिसतात.
——————–
चौकट : ( मनोरंजन वारीमध्ये उंच आकाश पाळण्याची क्रेझ )
गोलाकार आणि मधूनच तिरका होऊन फिरणारा मेरी गो राऊड, गोलात एकमेकाना धडकत जाणाऱ्या डॅशींग कार्स काळजाचा ठोका चुकत गोल मृत्युगोलात फिरणाऱ्या दोन वेगवान मोटारसायकल आणि एक मारुती कार, चिमुकल्यांचे आकर्षण असलेल्या पाण्यातील आगबोटी, मिनी ट्रेन देखील मोठ्यांसह बालगोपाळांसाठी कुतुहूल ठरतात.
——————–
चौकट : ( पन्नालाल गाढवामुळे अनेकांची होते पोलखोल )
जीवनातल्या विविध समस्यांवर आपली भूमिका व्यक्त करणारे पन्नालाल गाढव, अनेक चित्र विचित्र प्रश्न विचारले की हे जाऊन प्रेक्षकांसमोर उभे राहते. हा प्रकार अत्यंत विनोदी तेवढाच आफत आणणारा असून अनेकांची यामुळे पोलखोल होते. पण तरी देखील यातून मनोरंजन हाच एकमेव हेतू असतो. त्यामुळे पन्नालाल गाढवामुळे भल्याभल्यांची पोलखोल होताना दिसते. त्यामुळे वारीत आणि वारी झाल्यानंतर देखील पुढे काही दिवस हे मिनी एसेल वर्ल्ड पंढरपूरवासियांसह भाविकांचे देखील मनोरंजन करते.
——————–
चौकट : ( साधारण महिनाभर असते मनोरंजन वारी )
आषाढी वारी आली की विविध व्यवसायाबरोबर मनोरंजन वारीचेही आगमन होत असते, अनेक व्यवसाय होताच निघून जातात परंतु म नोरंजन वारीतील पाहणे, रेल्वे व इतर व्यावसायिक महिनाभर हा व्यवसाय करतात. कारण वारी झाल्यानंतर पंढरीतील स्थानिक नागरिक या मनोरंजन वारीचा आनंद घेण्यासाठी येत असतात.
Post Views: 7