सोलापूर – जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष श्री सातलिंग शटगार यांनी आज पुणे येथील शिक्षण उपसंचालकाची भेट घेऊन सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षकांच्या समस्येबाबत चर्चा केली. एस आय आर कामाबाबत शिक्षकांच्या समस्या मेडिकल बिल शालार्थ आयडी वैयक्तिक मान्यता या संदर्भातील शिक्षकांची कामाची होत असलेली दिरंगाई याबाबत चर्चा करून त्यांनी नाराज व्यक्त केली शिक्षकांना देत असलेल्या अशैक्षणिक कामामुळे विद्यार्थ्यांचे तरी नुकसान होत आहेत परंतु काही शिक्षक शिक्षिका आजारी पडलेली आहेत त्यांचे आरोग्याच्या समस्या निर्माण झालेली आहेत वरील मागणीकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी त्यावेळी त्यांनी केली यावेळी शिक्षण उपसंचालक यांनी वरील कामाबाबत होत असलेले माहिती घेऊन लवकरात लवकर कामाचा निपटारा होईल अशी ग्वाही दिली यावेळी जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी शिक्षण उपसंचालक गणपतराव मोरे यांची शाल भेट वस्तू देऊन सत्कार केले यावेळी त्यांच्या समवेत सिद्धाराम बनाळे करण गहिलवार प्रथमेश वाघमोडे आदी उपस्थित होते.
Post Views: 7