सांगोला – गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या पुण्यतिथीनिमित्त सांगोला विद्यामंदिर ज्यु.कॉलेज येथे गीतगायन स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य चारुदत्त जगताप, उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे, उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षिका शुभांगी घोंगडे आणि वाङ्मय विभाग प्रमुख प्रा.धनाजी चव्हाण उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमेस प्रदीप धुकटे व कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास चारुदत्त जगताप जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी घेण्यात आलेल्या स्पर्धेत भावगीत प्रकारात दिशा गायकवाड प्रथम, अनुजा खडतरे द्वितीय, स्वप्नाली इंगोले तृतीय, भक्तीगीत प्रकारात प्रमिला मिसाळ प्रथम, संस्कृती शिंदे द्वितीय, तेजस्विनी केंगार तृतीय, देशभक्तीपर गीत प्रकारात धानेश्वरी उकळे प्रथम, पल्लवी येलपले द्वितीय, ऋतुजा रोंगे तृतीय तसेच लोकगीत प्रकारात साक्षी जगधने व दिशा गायकवाड प्रथम, तेजस्विनी केंगार द्वितीय, तर आरती शिनगारे हिने तृतीय क्रमांक मिळवला. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके, उपाध्यक्ष ॲड. विजयसिंह चव्हाण, सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके, खजिनदार शंकरराव सावंत, सदस्य शीलाकाकी झपके, विश्वेश झपके यांनी अभिनंदन केले. या स्पर्धेचे परीक्षण प्रा.इसाक मुल्ला, प्रा.गीतांजली साखरे, प्रा.माधुरी केदार यांनी पाहिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.शिवशंकर तटाळे, सूत्रसंचालन प्रा.राधा रिटे यांनी केले. प्रा.निलेश नागणे यांनी आभार मानले.