अक्कलकोट – अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कै. भीमाशंकर वाघमोडे यांचे गौडगाव बुद्रुक, तालुका अक्कलकोट येथे दुःखद निधन झाल्याने त्यांच्या निमित्त पहिल्यांदाच ग्रामीण भागात शोकसभेचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी अक्कलकोट तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती राहून श्रद्धांजली वाहिली
याप्रसंगी एच. जी. प्रचंडे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेचे प्राचार्य शंकर व्हनमाने,जगद्गुरु पंचाचार्य हायस्कूलचे प्राचार्य कल्याणी देशेट्टी ,प्राध्यापक चिदानंद मठपती ,सिद्राम वाघमोडे, ईश्वर माशाळकर, रोहिणी वाघमोडे ,सुजाता खानापुरे, शशिकांत कळसगोंडा, राजकुमार साळुंखे, सोलापूर बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष संतोष पाटील ,पंचायत समिती सदस्य वैष्णवी सलगरे, सिद्धेश्वर साखर कारखाना संचालक शंकर पाटील, माझी सरपंच सिद्धाराम म्हेत्रे रमेश वघे , परमेश्वर सुतार, शांतय्य स्वामी व प्रकाश नन्नवरे, शिवाजी शिंदे, सोमनाथ कुंभार सर, परसराम कोरे, तुकाराम विंचुरे यांनी शोकसभेत श्रद्धांजली वाहिली.
या शोकसभेत अक्कलकोट स्टेशन कडबगाव, नाविंदगी , गुरववाडी, तोळनूर ,गौडगाव, नागणसूर, उमरगा, गुद्देवाडी, आधी गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
१) अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याणशेट्टी यांच्या परिवाराच्या वतीने मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी श्रद्धांजली वाहताना म्हणाले की, कै.भीमाशंकर वाघमोडे यांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, सहकार क्षेत्रातील काम उल्लेखनीय होते. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांच्या कुटुंबियाने वाटचाल करावी .. कल्याणशेट्टी वाघमोडे परिवाराचे एकनिष्ठ संबंध होते. त्यांच्या स्मृतीला कल्याणशेट्टी परिवाराच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
२) अक्कलकोट तालुक्यात तालुक्याचे माजी पंचायत समितीचे उपसभापती महीबूब मुल्ला म्हणाले कै.भीमाशंकर वाघमोडे यांच्या निधनाने गौडगाव व कडबगाव परिसराचे मोठे नुकसान झाले. यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी न भरुन निघणारी आहे .
३) कै. भीमाशंकर वाघमोडे यांचे सर्व क्षेत्रातील केलेले कार्य आमच्यासाठी उल्लेखनिय आहे त्यांनी घालून दिलेल्या आदर्शाप्रमाणे वाटचाल करू त्यांच्या जाण्याने आम्ही पोरके झालो . आमाचे आधारवड गेल्याची भावना त्यांचे लहान बंधू तालुक्याचे माजी गटविकास अधिकारी उत्तमराव वाघमोडे यांनी शोकसभेत व्यक केले.
Post Views: 9