सोलापूर – नाट्य महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी इश्क का परचा या नाटकाने सोलापुरातील नाट्य रसिकांना हास्याच्या पावसात तीन तास ओले चिंब करून टाकले.
हुतात्मा स्मृती मंदिर येथे अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या वतीने तीन दिवसाच्या कै. प्रमोद खांडेकर सांस्कृतिक नाट्य महोत्सवाचे उद्घाटन प्रमोद खांडेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून व दीप प्रज्वलाने महोत्सवाचे अध्यक्ष वीरेंद्र हिंगमिरे व युवा उद्योजक ज्योतिबा गुंड यांच्या हस्ते झाले. या नाटकात किरण लोंढे चा दिग्दर्शनासह दमदार अभिनयाचे सादरीकरण झाले. तसेच अभिजित दुपारगुडे, अक्षय कोरडे व समृद्धी भोसले च्या दमदार सहज अभिनयाला नाटय रसिकांनी भरभरून दाद दिली.असे नाट्यमहोत्सवाचे प्रमुख संयोजक अँड. बसवराज सलगर यांनी कळविले आहे.
या प्रसंगी प्रमुख संयोजक ॲड बसवराज सलगर, मा.संजय सावंत, मा. विजय साळुंखे, अस्तित्व मेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष किरण लोंढे, सचिन जगताप, आशुतोष नाटकर, दीपक काळे, अशपाक नदाफ, सागर देवकुळे, ओंकार साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.
महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी आनंद जाधव लिखित तसेच किरण लोंढे दिग्दर्शित इश्क का पर्चा या दोन अंकी नाटकाने झाली. अतिशय उत्तम मांडणी, अप्रतिम प्रकाशयोजना, संगीत साथ ,तसेच कलावंतांनी केलेली धमाल, यामुळे या नाटकाने प्रेक्षकांना मनमुराद हसवले. प्रत्येक क्षणाला झालेल्या विनोदाने नाटय रसिकांना खिळवून ठेवण्यात हे नाटक यशस्वी झाले. याप्रसंगी कलावंताच्या कलेला टाळ्यांची दाद प्रत्येक क्षणाला मिळाली.
या नाटकात प्रमुख भूमिका यश क्षिरसागर, आदित्य पांडे, मीनल चव्हाण यांनी केली.तसेच नेपथ्य सोमनाथ लोखंडे, प्रकाश योजना कृतार्थ कनसारा व संगीत साथ आयुष लोकरे यांनी दिली.
——–
Post Views: 6