पिलीव – सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर येथे नवीन अप्पर जिल्ह्य अधिकारी कार्यालय मंजुर झाले आहे .पंढरपूर येथील हे अप्पर जिल्ह्य अधिकारी कार्यालय खरेतर माळशिरस, सांगोला, पंढरपूर, माढा या तालुक्यासाठी अतिशय सोयिस्कर आहे .तसेच माळशिरस तालुका हा सोलापूर जिल्ह्यातील पश्चिम भागातील शेवटचा तालुका .माळशिरस पासुन सोलापूर जवळपास 120 ते 130 किलोमीटर आहे .तर पंढरपूर फक्त 40 ते 50 किलोमीटर आहे.यामुळेच तर पंढरपूर येथे होणारे अप्पर जिल्ह्य अधिकारी माळशिरस तालुक्यासाठी अतिशय सोयिस्कर आहे .यामुळे वेळ तर वाचणार आहेच शिवाय आर्थिक बचत सुद्धा होणार आहे.माळशिरस तालुक्यातील नागरिकांसाठी हे कार्यालय अतिशय सोयिस्कर होणार आहे.माळशिरस तालुक्यात दहा महसुली मंडळे आहेत.माळशिरस येथे तहसील कार्यालय ,पंचायत समीती ,नगरपंचायत आहे .तर अकलूज येथे उपविभागीय कार्यालय आहे .तर अकलूज नगरपरिषद आहे .याठिकाणी सर्व च कार्यालयातील कामकाजासाठी नागरिकांना व अधिकाऱ्यांना सध्या सोलापूर येथेच जावे लागते.माञ सध्या पंढरपूर येथे होणार कार्यालय माळशिरस तालुक्यासाठी वरदान ठरणार आहे .माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागातील शिंदेवाडी व सुळेवाडी ही शेवटच्या टोकाची गावे आहेत. तर पुर्व भागातील गावे ही फक्त पंढरपूर पासुन 30 ते 35 किलोमीटर आहे .जे अतिशय जवळ व सोयीस्कर आहे . माळशिरस तालुका हा सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे.कारण सर्वात जास्त पंचायत समिती जिल्ह्य परिषद सदस्य तसे 103 ग्रामपंचायती तसेच 112 महसुली गावे .माळशिरस, नातेपुते, महाळुंग येथे नगरपंचायती तर अकलूज येथे नगरपरिषद आहे .तालुक्याची लोकसंख्या चार लाख 85 हजार 645 एवढी आहे.तर भौगोलिक दृष्ट्या माळशिरस तालुका सर्वात मोठा आहे .माळशिरस तालुक्याचे क्षेत्र एक लाख साठ हजार 802 हेक्टर एवढे आहे .अश्या या सर्वात मोठ्या माळशिरस तालुक्यासाठी पंढरपूर येथील अप्पर जिल्ह्य अधिकारी कार्यालय खरेतर तर सर्व सामान्यांसाठी अत्यंत सोयीस्कर व जवळचे ठरणार आहे .यामुळे नागरिकांची वेळेची बचत होणार ,पैसा वाचणार आहे .तर कामे वेळेतच मार्गी लागणार आहेत.यामुळेच माळशिरस तालुक्यासाठी पंढरपूर येथेच अप्पर जिल्ह्य अधिकारी कार्यालय व्हावे अशी माळशिरस तालुकावासियांची अपेक्षा आहे .चौकट _ पंढरपूर येथे होणारे नवीन अप्पर जिल्ह्य अधिकारी कार्यालय हे माळशिरस तालुक्यातील जनतेसाठी अत्यंत सोयीस्कर आहे .यामुळे ते कार्यालय पंढरपूर येथेच व्हावे ._ शिवराज पुकळे ,जिल्ह्य अध्यक्ष भाजपा सोलापूर ( पश्चिम विभाग)
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...



















