माळशिरस – जिद्द चिकाटी व कष्ट करण्याची तयारी असेल तर कोणतेही यश मिळते , शिस्त असेल आपण यशस्वी होऊ शकतो असे. प्रतिपादन प्रदीप गोरड यांनी गोपाळराव देव प्रशालेच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरण समारंभात बोलताना केले.
यावेळी श्री हनुमान शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष ॲड माधव मिरासदार ,कार्याध्यक्ष ॲड मिलिंद कुलकर्णी ,कार्यवाह रामचंद्र दोशी, सहकार्यवाह राजाराम ढाले, सर्व संचालक,मुख्याध्यापक सूर्यकांत जानकर तसेच नगरसेवक माणिकराव वाघमोडे, बाळासाहेब सरगर, सचिन वावरे ,आप्पासाहेब वाघमोडे,सुरेश टेळे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरवात प्रतिमा पूजनाने झाली.प्रास्ताविक मुख्याध्यापक सूर्यकांत जानकर यांनी केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काटकर सर यांनी केले पारितोषिक वाचन राजमाने यांनी केले कार्यक्रमाचे आभार कुलकर्णी मॅडम यांनी मांडले कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापिका दिक्षित मॅडम पर्यवेक्षक बाबर सर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. वंदे मातरम गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली
Post Views: 13