पिलीव – महाराष्ट्रात यंदा कधी नव्हे ते बाजारपेठेत साखरेला उच्चांकी दर मिळाला आहे .अगदी गेल्या महीन्यात 42 रुपये किलो एवढा दर होता .तर आज ऑगस्ट महिन्यात साखरेचा बाजारपेठेत 55 रुपये प्रती किलो एवढा दर मिळत आहे .बाजारपेठेत दररोजच्या रोज मोठ्या प्रमाणावर साखरेची आवश्यकता असते .प्रत्येकाच्या घरात तसेच हाॅटेल किंवा इतर पदार्थ बनविण्यासाठी साखर मोठ्या प्रमाणात लागते .साखरेचा दैनिक वापर वरचेवर वाढतच आहे.बाजारात मोठ्या प्रमाणावर साखरेचा खप होतो .गतवर्षी पेक्षा यंदा बाजारात साखरेला जवळपास 10_ 15 रुपये एवढा जास्तीचा दर प्रती किलो मिळत आहे .यामुळे शेतकऱ्यांना गतवर्षी 3000 ते 3300 रुपये टन असणारा दर यंदा साखरेच्या किमतीचा अंदाज घेता ऊसाला यंदा 4000 ते 4500 टन एवढा चांगला दर शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे .साखरेच्या दरात झालेला उठाव पाहता तसेच वाढणाऱ्या मशागतीचा दर ,औषधांचा खर्च, व इतर सर्व खर्चाचा विचार करता ऊसाला 4500 हजार रुपये प्रतिटन एवढा दर मिळणे आवश्यक आहे.महाराष्ट्र सोडुन इतर सर्व राज्यात ऊसाला चार हजाराच्या वर दर आहे.फक्त महाराष्ट्रातच शेतकऱ्यांना चांगला दर मिळणे अपेक्षित आहे.महाराष्ट्रात इतर जिल्ह्यपेक्षा सोलापूर जिल्ह्यातच ऊसाला दर कमी आहे .विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने असुनसुदधा कारखानदार दर माञ सर्वात कमी देतात. साखरेतील दराचा उठाव पाहता महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना उच्चांकी दर मिळावा अशी शेतकरी वर्गाची मागणी आहे .खरेतर ज्या साखर कारखान्यात उप पदार्थ निर्मीती होते .त्याना तर चांगला दर देण्यास काहीच अडचण नाही कारण या कारखान्यात साखर, मोलॅसिस, विज निर्मीती, इथेनॉल ह्या सर्वच पदार्थांना चांगला दर मिळतो यामुळे शेतकऱ्यांना 4000 _ 4500 प्रतिटन दर द्यायला काहीच हरकत नाही . चौकट _ यंदा बाजारात साखरेला उच्चांकी 55 रुपये किलो एवढा चांगला दर आहे .यामुळेच कारखान्यानी यंदाच्या हंगामात 4500 टन एवढा दर द्यावा _ नितीन मदने _ पाटील, ऊस उत्पादक शेतकरी ,कुसमोड.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...





















