सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील पुतळा परिसरात उभारण्यात आलेल्या आकर्षक आणि ऐतिहासिक भिंतीशिल्पाचे उद्घाटन मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, मध्यवर्ती महामंडळाचे पद्माकर काळे, दिलीप कोल्हे, राजन जाधव, नगरसेवक विनोद भोसले, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, जयवंत सलगर, लता फुटणे, प्रकाश ननवरे, मतीन बागवान, नागेश वडणे, सचिन स्वामी, देविदास घुले, बसवराज कोळी, बजरंग जाधव यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, शिवप्रेमी नागरिक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महानगरपालिकेने उभारलेल्या या भिंतीशिल्पामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराला ऐतिहासिक आणि आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. भिंतीशिल्पातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, पराक्रम आणि स्वराज्याची प्रेरणा नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे हे शिल्प नागरिकांसाठी प्रेरणास्थळ ठरणार असून, शहराच्या ऐतिहासिक वैभवातही भर पडणार आहे.
कार्यक्रमावेळी उपस्थित मान्यवर आणि शिवप्रेमी नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून त्यांच्या महान कार्याचे स्मरण केले.
—-
Post Views: 19