सोलापूर – जुळे सोलापूर येथील शिवशंकर मंगल कार्यालयात वीर कोतवाल शिक्षण संस्था सोलापूर या संस्थेमार्फत गुणवंत विद्यार्थी व गुणवंत व्यक्ती सत्कार समारंभ संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्राध्यापक सोमनाथ यादव (बार्शी) हे होते, तर अध्यक्षस्थानी प्राध्यापक ज्ञानेश्वर काळे (अध्यक्ष) हे होते. कार्यक्रमास डॉक्टर अनिल हुलसुरकर, डॉक्टर सुहास राऊत, डॉक्टर सुहास जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक शहाजी दुधाळ, नागेश चौधरी, संस्थापक अध्यक्ष पांडुरंग चौधरी सर, उपाध्यक्ष एडवोकेट विकास तिन्हेकर, सचिव सुरेश गवळी, सहसचिव सचिन चौधरी, कोषाध्यक्ष देवदास शिंदे, ज्येष्ठ संचालक विजयकुमार माने, ज्येष्ठ संचालक भगवानराव काशीद, संचालक गणेश दळवी, दिनेश गवळी, संजय येऊ लकर, समाधान चौधरी आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात हुतात्मा वीर कोतवाल यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि पाहुण्यांच्या स्वागताने झाली. यामध्ये दत्तक पालक योजनेमध्ये ४१ विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य देण्यात आले, ५१ दहावीच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले तसेच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना पुरस्कार व बक्षीस देण्यात आले. समाजातील उत्कृष्ट कार्याबद्दल सहाय्यक कृषी अधिकारी रोशन खंडागळे, माजी प्राचार्य विश्वंभर काळे, माजी प्राचार्य बिबीशन माने, माजी मुख्याध्यापक सुरेश गवळी, समादेशक राहुल इंगळे, मृणालिनी शिंदे, आदर्श शिक्षक लेखक प्रशांत वाघमारे या १० गुणवंत व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच पांडुरंग चौधरी, भगवानराव काशीद, भीमराव गंगदरे, मधुकर श्रीवास्तव यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्यात नाशिक समाज बांधव आणि विविध संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनामध्ये समाजात एकी वाढवणे गरजेचे आहे, सर्वांनी शिक्षण घेणं महत्त्वाचं आहे असे मत प्रमुख पाहुणे डॉ. प्रा. सोमनाथ यादव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष भालेराव सर यांनी केले तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव सुरेश गवळी यांनी केले.
——






















