सोलापुर:-संभाजीराव शिंदे विद्यामंदिर संकुल,विडी घरकुल विभागाच्यावतीने शिक्षणमहर्षी
स्व.विष्णुपंत (तात्यासाहेब) कोठे यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त आयोजित, जिल्हास्तरीय कनिष्ठ महाविद्यालयीन ‘वक्तृत्व ‘स्पर्धेत, शर्वरी ब्रह्मदेव लोखंडे(11वी ‘विज्ञान’ विज्ञान )हिने ‘तृतीय’ क्रमांक प्राप्त केला. पारितोषिकाच्या स्वरूपात तिला रुपये 751 /- स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्राप्त झाले.तर, अर्पिता चंद्रशेखर धप्पाधुळे (11वी- विज्ञान) हिला, उत्तेजनार्थ 351/- रोख पारितोषिक व स्मृतिचिन्ह प्राप्त झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी, उपप्राचार्य अनुप म्हेत्रे, पर्यवेक्षक डॉ. जीवराज कस्तुरे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी हार्दिक अभिनंदन केले. यशस्वी विद्यार्थ्यांना चेतन तुपकर व चंद्रशेखर कस्तुरे यांनी मार्गदर्शन केले.
Post Views: 19