सोलापूर – जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील विदयार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषा विकासासाठी व इंग्रजी अध्यापन वृध्दींगत करण्यासाठी दक्षिण सोलापूर पंचायत समितीने विविध नवोपक्रम सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी सर्व मुख्याद्यापकांना
इंग्रजीमध्ये परीपाठ सादर, इंग्रजीमध्ये फलक लेखन , इंग्रजी वर्तमानपत्र वाचन, दैनंदिन इंग्रजी संभाषण व शाळा रॅंकींग स्पर्धा सुरु करण्याचे आदेश दिले आहेत.
फाईव्ह स्टार दर्जा प्राप्त करणाऱ्या शाळांना “Five Star School” म्हणून घोषित करण्यात येईल. अशा शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करून त्यांचा आदर्श इतर शाळांसमोर ठेवण्यात येईल.
दक्षिण सोलापूर तालुका हा बहुभाषिक तालुका असून तालुक्यातील अनेक मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची मातृभाषा कन्नड असल्याचे आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाचे अध्ययन करताना विविध भाषिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . परिणामी इंग्रजी विषयाबाबत विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास कमी होऊन त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता निर्माण होते. तसेच पुढे उच्च शिक्षण घेताना, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांशी स्पर्धा करताना त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्यता असते. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषेबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांचा आत्मविश्वास वाढावा तसेच दैनंदिन व्यवहारात इंग्रजीचा वापर करण्याची सवय लागावी या उद्देशाने तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये नवोपक्रम नियमितपणे राबविण्यात यावेत, अशा सूचना दिल्या आहेत.
परीपाठ, फलक लेखन , वर्तमानपत्र वाचन व दैनंदिन संभाषण यासाठी इंग्रजीचा वापर करण्यासाठी उपक्रम सुरू करण्यात येणार आहेत. तसेच इंग्रजी स्टार रैंकिंग योजनांतर्गत फाईव्ह स्टार दर्जा प्राप्त करणाऱ्या शाळांना “Five Star School” म्हणून घोषित करण्यात येणार असून अशा शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करून त्यांचा आदर्श इतर शाळांसमोर ठेवण्यात येणार आहे.
…..
चौकट
….
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढणार
….
बहुभाषिक दक्षिण तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाचे आवड निर्माण करून दैनंदिन वापर करण्यासाठी दक्षिण पंचायत समितीने नवीन उपक्रम सुरु केला आहे. बीडीओ मनोज राऊत व सर्व पदाधिकार्यांच्या सहकार्याने शैक्षणिक गुणवत्ता वाढणार आहे. यामुळे भविष्यात स्पर्धा परीक्षा देण्यासाठी मदत होईल.
संदिप टेळे, सभापती, दक्षिण सोलापूर
…..
फाईव्ह स्टार शाळा घोषित करणार
…..
सर्व मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी वरील उपक्रम प्रभावीपणे राबवून विदयार्थ्यांमध्ये इंग्रजी भाषा विकासासाठी इंग्रजी अध्यापन वृध्दींगत करावे. तसेच फाईव्ह स्टार दर्जा प्राप्त करणाऱ्या शाळांना “Five Star School” म्हणून घोषित करण्यात येणार असून अशा शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांचा विशेष गौरव करून त्यांचा आदर्श इतर शाळांसमोर ठेवण्यात येणार आहे.
मनोज राऊत, बीडीओ, दक्षिण सोलापूर पंचायत समिती























