बार्शी – सकल मराठा समाज बार्शीच्यावतीने महाराष्ट्र विधान परिषद सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भरघोस मतांनी विजयी झाल्याबद्दल मराठा भूषण राजेंद्र राऊत यांचा भव्य सत्कार सोमवार दि. १० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता मराठा मंदीर, छत्रपती कॅालनी, कुरडुवाडी रोड, बार्शी येथे आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते, कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. हभप जयवंत बोधले महाराज तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढारे, मराठा महासंघाचे नेते दास शेळके, सोलापूरचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, सुनील रसाळे, शंभूराजे युवा क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील मोरे, मराठा सेवा संघ सोलापूरचे जिल्हाध्यक्ष डॉ. जी. के. देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. तरी सर्व मराठा समाज बांधवांनी सहकुटुंब सहपरिवारासह उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज बार्शीच्यावतीने करण्यात आले आहे.