सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेने हॉटेल ॲम्बेसिडर ते निराळे वस्ती या मार्गाला स्व. अलकाताई पुरुषोत्तम बरडे मार्ग असे नामकरण करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. मात्र, हे नामकरण केवळ नामफलकापुरते मर्यादित न राहता या मार्गाचे सर्वांगीण सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.
या संदर्भात शिवसेनेचे सोलापूर शहर उत्तर समन्वयक सुरेश जगताप यांच्या नेतृत्वाखाली झोन अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या मार्गावर आकर्षक नामफलक उभारण्याबरोबरच नियमित स्वच्छता, वृक्षारोपण, विद्युत रोषणाई, रस्त्याची आवश्यक देखभाल तसेच नागरिकांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
याप्रसंगी युवासेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख राम वाकसे, युवासेनेचे शहरप्रमुख तुषार आवताडे, शाखाप्रमुख मारुती खानापुरे, दिगंबर मल्लाव, अजय मालशे, माळगे आदी उपस्थित होते.
Post Views: 21