गौडगांव – बार्शी तालुक्यातील गौडगाव ते धाराशीव सरहद्दीचे काम सुरु असून रस्त्याची एक बाजू खोदकाम करुन सोडून दिलेली आहे तर दूसरी बाजू माती टाकून वाहनांची गैरसोय करण्यात आली आहे .
बार्शी तालुक्याचे विधानपरिषदेचे आमदार राजाभाऊ राऊत यांच्या प्रयत्नाने बार्शी ते तुळजापूर रस्त्यासाठी ८०० कोटी रुपये मंजूर झाले. परंतू गेल्या ४ वर्षापासून ठेकेदाराकडून पाहिजे तितक्या वेगाने काम होत नसून प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. ज्या बाजूने वाहनांची आवक जावक आहे त्या बाजूने संगमनेरजवळ काळी माती टाकल्यामुळे वाहने जाणे मुश्किल झाले आहे. प्रवाशांनी व वाहनधारकांनीच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. शासनाने दिलेल्या प्रचलीत नियमानुसार रस्त्याचे काम होत नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत असल्याची चर्चा प्रवाशामध्ये होत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे.
Post Views: 15