देशात इलेक्ट्रिक वाहनांचा वाढता वापर लक्षात घेऊन कुशल ईव्ही तंत्रज्ञ तयार करण्याच्या उद्देशाने बजाज ऑटो लिमिटेड आणि जीटीटी फाऊंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या बजाज सर्व्हिस टेक्निशियन एक्सलन्स प्रोग्राम ( STEP) अंतर्गत अत्याधुनिक इलेक्ट्रिक वाहन (EV) सर्व्हिस टेक्निशियन प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन सोलापूर येथील नामवंत ए. जी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (AGPIT) येथे उत्साहात संपन्न झाले.
बजाज स्टेप हा विद्यार्थ्यांसाठी तीन महिन्यांचा पूर्णवेळ व पूर्णपणे मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम आहे.
या अभ्यासक्रमामध्ये इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांची रचना, देखभाल, दुरुस्ती, फॉल्ट डायग्नोसिस, बॅटरी तंत्रज्ञान,कंट्रोलर, मोटर, चार्जिंग सिस्टीम, वाहनांचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षण, सॉफ्ट स्किल्स, व्यक्तिमत्त्व विकास, मुलाखत तयारी तसेच रोजगाराभिमुख प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून बजाजच्या अधिकृत डीलरशिप नेटवर्कमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
उद्घाटन समारंभास बजाज ऑटो लिमिटेड यांच्या CSR व्यवस्थापक प्रियांशी शर्मा, जनरल मॅनेजर (सर्व्हिस) श्री.संपथ कुमार, एरिया सर्व्हिस मॅनेजर श्री. शुभम आणि श्री. राहुल उपस्थित होते. तसेच जीटीटी फाऊंडेशन, पुणे यांच्या प्रोग्राम मॅनेजर नवीला इश्तेयाक व सोबत क्लस्टर हेड यांनी उपस्थित राहून या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी शांती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. सिद्धेश्वर पाटील, सेक्रेटरी मा. एस. एस. पाटील, कॅम्पस डायरेक्टर डॉ. एम. ए. चौगुले, प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार, सर्व विभागप्रमुख तसेच ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षण केंद्राची पाहणी, विद्यार्थ्यांनी सादर केलेले इलेक्ट्रिक वाहनांचे प्रात्यक्षिक, उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच उद्योग- शैक्षणिक सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमास आहेरकर बजाजचे श्री. राजेश आहेरकर, माऊली ऑटोमोबाईल्सचे श्री. मिथुन झिरपे, शिवशंभो
ऑटोमोबाईल्सचे श्री. दादासाहेब गवळी, अश्विनी ऑटोमोबाईल्सचे श्री. दिनेश तसेच विजय ऑटोमोबाईल्सचे श्री.आशुतोष उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत वाहन उद्योगातील रोजगाराच्या संधी आणि करिअरच्या विविध पर्यायांबाबत मार्गदर्शन केले.जीटीटी फाऊंडेशन, पुणेचे सेंटर मॅनेजर श्री. ओंकार चक्रपाणी व त्यांच्या संपूर्ण टीमने कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.
उपस्थित मान्यवरांनी या प्रशिक्षण केंद्रामुळे सोलापूर व परिसरातील अभियांत्रिकी, पॉलिटेक्निक आणि आयटीआय विद्यार्थ्यांना आधुनिक इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञानाचे उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त केला.
*फोटो ओळी:- याप्रसंगी जनरल मॅनेजर श्री.संपथ कुमार यांच्यासमवेत शांती एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. सिद्धेश्वर पाटील व प्राचार्य डॉ. व्ही. व्ही. पोतदार*
Post Views: 22