सोलापूर : सोलापूर शहरातील सहकारी बँका टिकल्या पाहिजेत यासाठी सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी प्रयत्न करणे अपेक्षित आहे असे आवाहन शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांनी महावीर बँकेची चौफेर प्रगती ही सहकार क्षेत्रासाठी आदर्शवत असल्याचे सांगितले. श्री महावीर अर्बन को ऑफरेटिव्ह बँकेच्या 29 व्या वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमेळीच्या गुजराती मंगल कार्यालयात पार पडली,त्यावेळी ते बोलत होते. बँकेला यंदावर्षी 8.91 कोटी नफा झाला व सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला.
आ. देवेंद्र कोठे म्हणाले आपल्याला कर्ज पाहिजे तेव्हा आपण कमी व्याजदर असलेल्या बँका म्हणजे नॅशनल बँका शोधतो आणि ठेवी ठेवताना जास्त व्याजाची अपेक्षा असते. त्यामुळे सहकारी बँकांना तारतम्य पाळून बँक चालवावी लागते. अशा परिस्थितीत बँकेने प्रगती करीत आहे. 38 कोटी वरून 530 कोटी पर्यंत मजल मारली ते गौरवास्पद आहे. त्यामुळे सर्व संचालक व सभासदांचे अभिनंदनास पात्र आहात, असे प्रतिपादन आमदार देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केले.
या वेळी बँकेचे बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे संचालक ज्ञानेश्वर म्याकल यांचा स्विकृत नगरसेवक झाल्याबद्दल आमदार देवेंद्र कोठे, बँकेचे अध्यक्ष दिपक मुनोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी दशरथ वडतीले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बोर्ड ऑफ मॅनेजमेंटचे अध्यक्ष इंद्रमल जैन यांनी प्रास्ताविक केले.
सभेला संबोधित करताना बँकेचे अध्यक्ष दिपक मुनोत यांनी गेल्या वर्षभरातील बँकेचा प्रगतीचा अहवाल उपस्थित सभासदांसमोर मांडला. यामध्ये प्रामुख्याने बँकेने ग्राहकांसाठी चालू केलेलं मोबाईल बॅकिंग, आयएमपीएस, युपीआय या डिजिटल सुविधांव्दारे आजर्यंत 1200 कोटी रूपयांची उलाढाल यशस्वीरित्या झाली आहे, याची माहिती दिली. बँकेने 2012 साली 38 कोटी ठेवी वरून आज अखेर बॅकेच्या ठेवी 530 कोटी ठेवीचा पल्ला पार केला आहे. तसेच बँकेच्या स्वमालकीच्या चार वास्तू असून मुख्य शाखेसाठी कॉर्पोरेट ऑफिस उभारण्यासाठी सभासदांनी सूचना केल्या आहेत.
इंदरमलजी जैन व चेतन बाफना यांच्या वतीने पाच शैक्षणिक संस्थाना १५ संगणक व प्रिंटर प्रदान करण्यात आले. तसेच चार्टर्ड अकौंटन्ट परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल तुषार लड्डा यांचा सत्कार करण्यात आला. सदर वार्षिक सर्वसाधारण सभेस व्हा. चेअरमन संजय सेठीया, संचालक रविंद्र गुजराथी, नारायण गंजी, गोंविद भैय्या, गिरीष देवरमनी, गौतमचंद संचेती, श्रीनिवास चिलका, संतोष भंडारी, भैरूलाल कोठारी, चेतन बाफना, श्यामसुंदर पवार,राजशेखर हिरेमठ, अरूण साळुंके, सौ. माधुरी पारेख, सौ. पूनम लोणावत, नितीन नावंदर, नंदकिशोर उदगीरी,जयंत होलेपाटील, राहुल कोरुलकर, सुशील सोनिग्रा आदी संचालक उपस्थित होते.
या सर्वसाधारण सभेला जिल्हा मुख्य सरकारी वकील डॉ. प्रदिपसिंग राजपूत, दशरथ वडतिले, कल्पेश मालू, ओमप्रकाश लड्डा, दिनकर देशमुख, विजय डाकलिया, रामवल्लभ जाजू, पुरूषोत्तम बलदवा, अशोक संकलेचा, पेंटप्पा गड्डम, काशिनाथ गड्डम, पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप, अशोक छाजेड, जिनेंद्र सुराणा, जयचंद वेद, बस्तीमल संकलेचा, ईश्वर मालू, रमेश जैन, रंगनाथ येरमवार, किरण करकमकर, सहकार भारतीचे आगरथडे, विनायक राचर्ला, शाम येमूल, माजी नगरसेविका प्रमिला पल्ली, सरिता वडनाल, चंद्रकांत रमणशेट्टी आदी मान्यवरासहित सभासद उपस्थित होते.
Post Views: 6