सोलापूर – येथील इन्हरव्हील क्लब ऑफ सोलापूर स्टारलेटचा पदग्रहण सोहळा आयएमए सभागृहात डफरिन चौक येथे पार पाडला.
या क्लबच्या नूतन अध्यक्षा संध्याराणी श्रीधर रच्चा, व नूतन सचिव आम्रपाली रेवणसिद्ध कोनापुरे यांचे निवड झाली आहे. या पदग्रहण समारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उमा दिक्षित जोशी, डिस्ट्रिक्ट ट्रेझरर – स्मिता चाकोते, रोटरी क्लबच्या डिस्ट्रिक्ट गव्हर्नर जयेश पटेल, पद्मजा अय्यंगार,
रेखा माने, अनुराधा चंडक, भारती पटेल, श्वेता पाटील, किशोरी राठी, रोटरी क्लब नॉर्थच्या नूतन अध्यक्षा आसावरी सराफ, इनरव्हील क्लब नूतन अध्यक्षा दीप्ती देसाई, सचिव जेमिनी बक्षी, तसेच इनरव्हील हार्मनी क्लबच्या अध्यक्षा नेहा राठी , सचिव पूजा भुतडा उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमाची सुरुवात इनरव्हील प्रार्थनेने झाली, त्या नंतर मावळत्या अध्यक्षा सोनिया चंकेश्वर यांनी त्यांच्या कार्यकाळात झालेल्या आढावा सादर केला.
तद्नंतर नूतन पदाधिकारी उपाध्यक्ष श्रद्धा घोंगडे व पदाधिकारी अर्चना आघव, गंगा लोणी, नंदा भट्टड, तेजल जवंजाळ, यामिनी गांधी, वैशाली लाहोटी यांच्याकडे क्लबच्या पदाची सुत्रे सोपवण्यात आली
या पदग्रहण सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट म्हणजे आदर्श विद्यालय बाळीवेस येथील 100 होतकरू मुलींसाठी शालेय गणवेश नूतन अध्यक्षा संध्याराणी श्रीधर रच्चा यांच्या तर्फे भेट देण्यात आले आहे. आगामी काळात अध्यक्षीय वर्षात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात असून, शालेय विद्यार्थ्यांसाठी गणवेश व शैक्षणिक विकास, क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रयत्न करणार असून व समाजातील गरजू रुग्णांना आवश्यक उपचार करून देण्यासाठी योग्य तो सुविधा उपलब्ध करून देण्यावर प्रामुख्याने भर राहणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रम प्रस्तावना काजल सिंदगी यांनी केले. मनीषा डागा व पूनम कटकधोंड यांनी सूत्रसंचालन केले. श्वेता पाटील यांनी आभार मानले..